शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
2
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
3
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
4
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
5
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
6
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
7
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
8
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
9
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
10
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
11
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
12
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
13
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
14
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
15
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
16
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
17
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
18
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
19
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
20
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल

ना डॉक्टर, ना औषध रुग्ण सोसताहेत मरणयातना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 00:13 IST

गरीब रुग्णांसाठी ग्रामीण रुग्णालय आजारातून मुक्ती मिळविण्यासाठी आशेचा किरण असतो.

ठळक मुद्देअनास्था : नांदगावची आरोग्य यंत्रणाच आजारी, अस्वच्छतेचा कळस

मनोज मानवतकर।आॅनलाईन लोकमतनांदगाव खंडेश्वर : गरीब रुग्णांसाठी ग्रामीण रुग्णालय आजारातून मुक्ती मिळविण्यासाठी आशेचा किरण असतो. परंतु नांदगाव येथे आरोग्य यंत्रणेचाच बोजवारा उडाला असल्याने रुग्णांना मरणयातना सहन करण्याशिवाय पर्यायच राहिलेला नाही. शहरातील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांवर उपचार करण्यासाठी डॉक्टर नाही, औषध नाही. वॉर्डात अस्वच्छतेने कळस गाठला आहे. ही स्थिती तातडीने सुधारावी, या रुग्णांच्या मागणीकडे प्रशासनातील कुणीच अद्याप लक्ष दिले नाही.नांदगाव शहराची लोकसंख्या १५ हजारांवर आहे, तर ग्रामीण रुग्णालयात शहरासह तालुक्यातील दररोज २५० ते ३०० रुग्णांची ओ.पी.डी. होते. रुग्णांवर उपचार करण्यासाठी शासनाने एम.बी.बी.एस. डॉक्टरांची नियुक्ती केली आहे. परंतु, सद्यस्थितीत याठिकाणी डॉक्टरच उपलब्ध नसल्याने रुग्णालयाचा कारभार राष्टÑीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत तपासणी पथकातील शिकाऊ डॉक्टरांद्वारे चालविला जात असल्याची धक्कादायक बाब निदर्शनास येत आहे. या ठिकाणी औषधांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. टायफॉइडच्या रुग्ण, मधुमेह व रक्तदाबाच्या रुग्णांकरिता औषध नाही. एवढेच नव्हे तर खोकल्याचे औषध नाही. लहान मुलांवर औषधोपचाराचीही येथे सुविधा नाही. खाज व लहान-सहान दुखण्यांसाठी क्रीम उपलब्ध नाही. रुग्णांकरिता ग्रामीण रुग्णालयात पाण्याची सुद्धा कमतरता आहे.रुग्णालय परिसरात तसेच रुग्णांच्या वॉर्डात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. रुग्ण कक्षातील संडास, बाथरूमची दयनीय अवस्थ झाली आहे. सगळीकडे घाण पसरल्याने ग्रामीण रुग्णालयच आजारी पडल्याचे दिसून येत आहे. ज्या रुग्णांची आर्थिक स्थिती अतिशय नाजूक आहे, ज्यांना खासगी दवाखान्यात उपचार घेणे आवाक्याबाहेरचे आहे, अशा गरीब रुग्णांना जर ग्रामीण रुग्णालयात पुरेशी आरोग्य सेवा मिळत नसेल, तर त्यांनी कुढत मरण जवळ करावे का, असा प्रश्न लोकमानसात विचारला जात आहे.पोस्टमार्टम अमरावतीलाग्रामीण रुग्णालयात समस्या वाढतीच आहे. येथे रुग्णांसाठी आॅक्सीजनची व्यवस्था नाही. पोस्टमार्टमसाठी अमरावतीला जावे लागते. त्यासाठी अ‍ॅम्ब्यूलन्सदेखील उपलब्ध नाही. रुग्णसेवेकरिता तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता तर आहेच, कर्मचारीदेखील पुरेशा संख्येने नसल्याने रुग्णांची आबाळ होते.मोखड येथील अस्थमा (दमा) च्या रुग्ण कांताबाई नानाजी पवार यांना ग्रामीण रुग्णालयात भरती केले. आॅक्सीजनअभावी तीन तास ताटकळत ठेवले. अखेर त्यांची स्थिती नाजूक झाल्याने औषधोपचारासाठी अमरावतीला न्यावे लागले.- दुर्गेश सोळंके,मोखड.