शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

वृक्ष तोडू नका, चिमुकल्यांची आर्जव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 23:09 IST

शहरातील रस्त्याच्या कडेला असलेल्या जवळपास ३५ हिरव्या वृक्षांना कापू नये, असी आर्जव चिमुकल्यांनी वृक्षांना मिठी मारत केली.

ठळक मुद्देआदिवासी पर्यावरण संघटनेचा पवित्रा : झाडांना मारली मिठी, वृक्ष संगोपनाचा जागर

आॅनलाईन लोकमतपरतवाडा : शहरातील रस्त्याच्या कडेला असलेल्या जवळपास ३५ हिरव्या वृक्षांना कापू नये, असी आर्जव चिमुकल्यांनी वृक्षांना मिठी मारत केली. रस्ता चौपदरीकरणासाठी कंत्राटदाराने नगरपालिकेकडे परवानगी मागितली आहे. या पार्श्वभूमीवर आंदोलन उभारले जात असून, त्यात बालकांचा सहभाग आहे.परतवाडा-अमरावती मार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामासाठी ६० पेक्षा अधिक वृक्ष कापण्यात आले होते. आता पुन्हा अकोला-इंदूर महामार्गाला जोडण्यासाठी परतवाडा शहरातील ३५ वृक्ष कापण्याची परवानगी मागण्यात आली आहे. शहरातील झाडे कापू नये, यासाठी आदिवासी पर्यावरण संघटनेच्या माध्यमातून आंदोलन छडले आहे. शालेय विद्यार्थ्यांनी या आंदोलनात सहभाग नोंदविला. शाळांमधून वृक्षांचे फायदे गिरविले जात असल्यामुळे शहरातील पर्यावरण सामाजिक संस्थेसह चिमुकल्यांनी आपल्या इवल्याश्या हातात महाकाय वृक्ष कवेत घेत ते कापू नका, अशी विनवणी केली. यामध्ये निर्भय खांझोडे, श्रुतिका डोंगर, संजित प्रजापती, समीर शहा, रजा खान या चिमुकल्यांचा सहभाग होता. संघटनेचे योगेश खानझोडे, प्रदीप चांदूरकर, सुरेश प्रजापती, मनिराम चिलाटी, बाबाराव बेठे, किसान जामकर, ममता डहाके आदींनी एसडीपीओंसह नगरपालिकेला निवेदन दिले.आधी वृक्षारोपण कराशासनाच्या विकासकामात अडथळा ठरणाऱ्यां झाडांची कापणी ठरलेली असल्याचे मत अधिकाºयांनी व्यक्त केले. तथापि, एक झाड कापल्यावर त्याऐवजी दहा वृक्ष लावा व साडेतीनशे वृक्षरोपण करा. त्याच्या संवधार्नाची जबाबदारी पूर्णपणे संबधित वृक्षतोड करणाऱ्यांनी घ्यावी आणि तसे लेखी द्यावे, अशी मागणी मान्य असेल, तरच वृक्षतोडीची परवानगी प्रशासनाने द्यावी, अन्यथा कुठल्याही परिस्थिती वृक्षतोड होऊ देणार नसल्याचा इशारा देण्यात आला आहे.आवाज कोण ऐकणार!गुरुवारी परतवाडा शहरातील आठवडी बाजार असतो. त्यामुळे शहरात ग्रामीण भागातील मोठ्या संख्येने नागरिक येतात. अशात अंजनगाव ते बैतुल स्टॉपवरील झाडांना चिमुकल्यांनी आपल्या कवेत घेतल्याचे चित्र रस्त्याने ये-जा करणाºयांसाठी कौतुकाचा विषय ठरले होते. मात्र, त्यांची ही कळकळ प्रशासन ऐकेल का, हे आज तरी अनुत्तरित आहे.वृक्षतोड परवानगी नाकारावी, अशी आमची मागणी आहे. प्रत्येक झाडाच्या मोबदल्यात दहा झाडे लावण्यात यावी. तसे लेखी लिहून घ्यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.- योगेश खानझोडेअध्यक्ष, आदिवासी पर्यावरण संघटना, परतवाडा