शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याला घाबरु नका, संयम पाळा

By admin | Updated: April 2, 2015 00:27 IST

नागरी वस्तींच्या विस्तारामुळे बिबट्यांच्या अधिवासात अडथळा निर्माण झाला आहे.

अमरावती: नागरी वस्तींच्या विस्तारामुळे बिबट्यांच्या अधिवासात अडथळा निर्माण झाला आहे. बिबट नागरी वस्तीत आला नसून नागरीकच त्यांच्या अधिवासात गेले आहे. बिबट मांजर प्रजातीचा असून त्याला मानवी वस्तीजवळ राहण्याची सवयच आहे. त्यामुळे बिबट्याला न घाबरत थोडा संयम पाळा, आक्रमक होऊ नका, असे, आवाहन मुख्य वनसंरक्षक संजीव गौड यांनी केले. जंगलातील खासगी क्षेत्रात नागरी वस्ती दिवसेदिवस वाढत आहे. त्यामुळे जंगलाला चारही बाजूने नागरी वस्तीचा वेढा निर्माण झाला आहे. जंगलात राहणारे वन्यजीव जगंलाबाहेर आल्यास ते सरळ मानवी वस्तीत येत असल्याचे आढळून येत आहे. बिबट्याला नागरिक वस्तीत सहजरित्या खाद्य उपलब्ध होत असून त्यांच्यासाठी ते वातावरण पोषक ठरत आहे. त्यातच बिबटची मानवी वस्तीजवळ राहण्याची प्रवृत्ती असते. त्यामुळे तो मानवी वस्तीच्या आजुबाजुला अधिवासात राहतो. हळूहळू नागरी वस्तीचा विस्तार जंगल भागाकडे होत आहे. त्यामुळे बिबट्यांचे दिसणे साहजिकच आहे. हळूहळू नागरीक जगंलाच्या अधिवासात जात असल्याने वन्यप्राणी दिसण्याचे प्रमाण वाढले आहे. ही परिस्थीती मानवामुळेच उदभवली आहे, असे मत मुख्यवनसंरक्षक गौड यांनी ‘लोकमत’शी बोलताना मांडले. एसआरपीएफ कॅम्प परिसरात डुक्कर व श्वान सारखे भक्षक जवळच उपलब्ध होत असल्यामुळे बिबट तेथे वास्तव्यास आले. मात्र, घाबरुन न जात सुरक्षेसाठी जगंलाजवळील परिसरात सकाळी व सायंकाळी जाणे टाळले पाहिजे, असे आवाहन गौड यांनी केले आहे.रात्री १२.३० ला बिबट कॅमेऱ्यात कैदवनविभागाच्या शिकारी प्रतिबंधक विभागाने एसआरपीएफ कॅम्प परिसरात लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यांमध्ये मंगळवारी रात्री १२.३० वाजता बिबट कैद झाला. बिबट्याने नाल्याजवळील परिसरात फेरफटका मारल्यावर तेथून निघून गेल्याचे कॅमेऱ्यांत कैद झाले आहे. दोन दिवसांपासून बिबटाचा वावर कमी झाल्याचे वनविभागाचा निदर्शनास आले.