शहरं
Join us  
Trending Stories
1
१८ वर्षाखाली सहमतीने शारीरिक संबंध ठेवू शकतो का?; केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात दिलं उत्तर
2
थायलंडमध्ये भारतीय पर्यटकांचे लाजिरवाने कृत्य; मौजमजेसाठी बारगर्ल बोलविली आणि तिच्या शरीरावरच घेतला आक्षेप...
3
उपराष्ट्रपतीपद भाजपकडेच ठेवण्याचा प्रयत्न; एनडीएतील घटक पक्षांशी चर्चा
4
आजचे राशीभविष्य २५ जुलै २०२५ : या राशीला नशिबाची साथ लाभेल, धन प्राप्तीचे योग
5
ना नोकरी, ना सॅलरी तरीही मिळालं ५.५० कोटींचं कर्ज; SBI मध्ये मोठा घोटाळा उघड, १८ जण अटकेत
6
भारत, ब्रिटनमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करार; ९९ टक्के भारतीय वस्तूंच्या निर्यातीवर शुल्क नाही
7
गाझामध्ये पूर्ण युद्धबंदी लागू करा, भारताचे आवाहन; संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत मांडले मत   
8
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प ठरले भारी, कोलंबिया विद्यापीठ नमले! आता सरकारला २२० दशलक्ष डॉलर देणार
9
संसदेत गोंधळामुळे चौथ्या दिवशीही कोंडी; दोन्ही सभागृहांचे कामकाज पुन्हा तहकूब
10
रशियात विमान कोसळून ४८ जणांचा मृत्यू; अपघाताचे कारण अद्यापही गुलदस्त्यात
11
विघ्नहर्ता, प्रवासाचे विघ्न दूर करशील का? गणपती विशेष गाड्या पहिल्या मिनिटालाच फुल्ल
12
ताईसाहेबांचे सासर, माहेर कोणते? मतदारांना मतपत्रिकेवर समजणार!
13
सहा फुटांपर्यंतच्या पीओपी मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच; हायकोर्टाने घातले बंधन; सरकारला निर्देश
14
‘स्लिपिंग प्रिन्स’ला कधीच जाग येणार नाही! सौदीच्या 'झोपलेल्या राजकुमारा'चा प्रवास थांबला
15
कोकाटेंची खुर्ची अजून शाबूत कशी? कृषीमंत्र्यांच्या 'बडबोलेपणा'वर अजितदादांचे मौन का?
16
अनिल अंबानींशी संबंधित ३५ ठिकाणी ईडीचे धाडसत्र; निवासस्थानी मात्र कारवाई नाही
17
स्विगी-झोमॅटो : ‘गिग’ कामगारांना हवी कायद्याची सुरक्षा
18
मातृभाषेचा अभिमान बाळगताना अन्य भाषांचाही सन्मान करावा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
19
संपादकीय : बीसीसीआयला 'सरकारी' वेसण! ऑलिम्पिकच्या दिशेने मोठे पाऊल
20
७/११ : आरोपींच्या निर्दोष मुक्ततेला ‘सुप्रीम’ स्थगिती; आरोपी बाहेरच राहणार! पण.. 

हार्डवर्क करा, गुन्हे घडता कामा नये !

By admin | Updated: June 9, 2016 00:22 IST

पोलिसांनी हार्डवर्क करायलाच हवे, हॉटेल, लॉज, धाबे व हातगाड्या ही ठिकाणे गुन्हेगारांचे आश्रयस्थाने आहेत.

सीपींच्या कडक सूचना : दररोज तासभर पोलिसांशी संवादअमरावती : पोलिसांनी हार्डवर्क करायलाच हवे, हॉटेल, लॉज, धाबे व हातगाड्या ही ठिकाणे गुन्हेगारांचे आश्रयस्थाने आहेत. यासर्व ठिकाणांची तपासणी करून गुन्हेगारांवर वॉच ठेवा, गुन्हे घडता कामा नयेत. लोकांच्या तक्रारी माझापर्यंत येत आहेत, अशा सक्त सूचना पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना वायरलेसवर दिल्यात. पोलीस आयुक्त थेट संवादातून पोलिसांची चाचपणी करीत आहेत. पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी पदभार सांभाळल्यापासून गुन्हेगारीसंदर्भात आढावा घेतला. गुन्हेगारीचा आलेख व वाहतूक नियंत्रणासंदर्भात अभ्यास केल्यावर त्यांना गुन्हेगारी वाढल्याचे निदर्शनास आले होते. नागरिकांसह विविध संघटनांकडून प्राप्त झालेल्या तक्रारी आणि पत्रकारांशी संवाद साधताना लक्षात आलेल्या समस्यांवर पोलीस आयुक्तांनी लक्ष केंद्रीत केले आहे. त्यानुसार त्यांनी नियोजनास सुरूवात केली. दरम्यान काही पोलीस कर्मचारी कामचुकारपणा करीत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी सर्वप्रथम पोलिसांनाच शिस्त लावण्याचे काम हाती घेतले. पोलीस आयुक्तांनी विविध शाखेच्या पोलिसांना आयुक्तालयात बोलावून त्यांची कानउघाडणी सुरु केली. त्यांच्या कामाचा आराखडा तयार करून त्यानुसार फेरबदल सुरु केले. दोषी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली. सद्यस्थितीत वायरलेसवरूनच ते कर्मचाऱ्यांना सूचना देत आहेत. मंगळवारी सायंकाळी वायरलेसवर ‘व्हिक्टर कॉलिंग’ झाले. नि:शब्द होऊन कर्मचारी पोलीस आयुक्तांच्या सूचना ऐकू लागले. सीपींच्या या कार्यशैलीचे नागरिक कौतुक करीत आहेत. गुन्हेगारी रोखण्यासाठी हे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. अवैध धंदे सुरु असल्याचे निदर्शनास आले तर संबंधित ठाणेदारांची खैर नाही, अशा सूचना सीपींनी दिल्या आहेत.