शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आली दिवाळी... बाजारात उत्साह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2021 05:00 IST

दिवाळी हा आनंद, मांगल्याचा सण. गरीब असो वा श्रीमंत, आपल्या परीने हा सण साजरा करतोच. कोरोनातून सावरत असताना अनेकांची आर्थिक बाजू जेमतेम आहे. तरीही बाजारपेठेत दिवाळीसाठी होत असलेली गर्दी ‘आली दिवाळी - ती साजरी करू या’ असा अनुभव येत आहे. कोरोना असला तरी त्याच्यासमवेत जगावे लागेल. त्यामुळेच गत १५ दिवसांपासून बाजारपेठेत विविध साहित्य, वस्तू खरेदीसाठीची लगबग सुरू झाली आहे. नोकरदार वर्गाच्या हाती दिवाळी बोनस आल्याने शहरातील मुख्य बाजारपेठेत गर्दी वाढली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : दीड वर्षांपासून कोरोना ठाण मांडून आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर त्याचा कहर ओसरला असून निर्बंध शिथिल झाले आहेत. यामुळे आर्थिक उलाढाल पूर्वपदावर येत आहे. परिणामी दोन वर्षांनंतर यंदाच्या दिवाळीत बाजारपेठेत कमालीचा उत्साह आहे. जेमतेम पाच दिवसांवर आलेल्या या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर दुकाने, आस्थापनांमध्ये खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडाली आहे. दिवाळी हा आनंद, मांगल्याचा सण. गरीब असो वा श्रीमंत, आपल्या परीने हा सण साजरा करतोच. कोरोनातून सावरत असताना अनेकांची आर्थिक बाजू जेमतेम आहे. तरीही बाजारपेठेत दिवाळीसाठी होत असलेली गर्दी ‘आली दिवाळी - ती साजरी करू या’ असा अनुभव येत आहे. कोरोना असला तरी त्याच्यासमवेत जगावे लागेल. त्यामुळेच गत १५ दिवसांपासून बाजारपेठेत विविध साहित्य, वस्तू खरेदीसाठीची लगबग सुरू झाली आहे. नोकरदार वर्गाच्या हाती दिवाळी बोनस आल्याने शहरातील मुख्य बाजारपेठेत गर्दी वाढली आहे.

आकाशदिवे, पणत्यांनी दुकाने सजलीदिवाळीसाठी आकाशदिवे, मेणाच्या व मातीच्या पणत्यांनी सजलेली दुकाने लक्ष वेधून घेत आहेत. दिल्ली, मुंबई, अहमदाबाद येथे तयार केलेले साहित्य विक्रीसाठी बाजारपेठेत दाखल झाले. 

तयार वस्त्रांना पसंतीयंदा दिवाळीत तयार वस्त्रांना पसंती दिली जात आहे. कोरोनानंतर पहिल्यांदाच निर्बंध हटल्यानंतर दिवाळी सण आल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. कर्मचारी बोनसमुळे आनंदी आहेत. 

डिपार्टमेंटलकडे कलकापड दुकानांमध्ये गर्दी वाढली आहे. दुकानदारांनी दिवाळीच्या व्यवसायासाठी कोरोनाकाळात धुळीने माखलेली दुकाने स्वच्छ केली. एकल दुकानांऐवजी डिपार्टमेंटल स्टोअरमधून कपड्यांशिवाय अन्य वस्तू खरेदी करण्याचा आनंद अमरावतीकर घेत आहेत. तथापि, नावाजलेली एकल दुकानेही कोरोनाकाळात बुडालेला व्यवसाय करीत आहेत. 

शेतकरी वर्ग बाजारातून गायब नोकरदार वर्गाच्या हाती वेतन, बोनसची रक्कम आहे. मात्र, शेतकरी निसर्गाच्या संकटातून अद्यापही सावरला नाही. बाजार समितीत भाव पाडून सोयाबीनची खरेदी केली जात आहे. दिवाळीच्या खरेदीसाठी सजलेल्या बाजारात शेतकरी कुठेही नाही, असे वास्तव आहे.

- यंदा चायना फटाके बाजारात विक्रीसाठी आणले जाणार नाहीत, असा निर्णय फटाके विक्रेत्यांनी घेतला आहे. चायना फटाके हे आरोग्यासाठी घातक ठरतात, अशी काही अंशी खरी ठरणारी भीती त्यामागे आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMarketबाजार