शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा मार्ग शंभर टक्के खड्डेमुक्त, एमडीआरचे ९२ टक्के रस्ते दुरुस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2017 18:46 IST

जिल्ह्यात १५ डिसेंबरपर्यंत मुख्य राज्य मार्ग व राज्य मार्ग १०० टक्के  खड्डेमुक्त करण्यात आले, तर  प्रमुख जिल्हा मार्ग (एमडीआर) चे ९२ टक्के रस्ते खड्डेमुक्त करण्यात आल्याचा अहवाल अमरावती सार्वजनिक बांधकाम विभागाने शासनाकडे पाठविला आहे. 

अमरावती :  जिल्ह्यात १५ डिसेंबरपर्यंत मुख्य राज्य मार्ग व राज्य मार्ग १०० टक्के  खड्डेमुक्त करण्यात आले, तर  प्रमुख जिल्हा मार्ग (एमडीआर) चे ९२ टक्के रस्ते खड्डेमुक्त करण्यात आल्याचा अहवाल अमरावती सार्वजनिक बांधकाम विभागाने शासनाकडे पाठविला आहे. जिल्ह्यात ७० कोटींच्या कामांच्या निविदा काढण्यात आल्या आहेत.   जिल्ह्यात १८६७.७४ किमी  मुख्य जिल्हा मार्ग व राज्य मार्ग आहेत, तर १६०३.५४ किमीचे  प्रमुख जिल्हा मार्ग आहे.  ज्या रस्त्यांवर खड्डे पडले होते. त्यामध्ये ५५६.६ किमीचे रस्ते हे मुख्य जिल्हा मार्ग व  राज्यमार्गावर  खड्डे पडले होते. ते खड्डे सार्वजनिक बांधकाम विभागाने निविदा काढून बुजविण्यात आले असून, हे रस्ते शंभर टक्के खड्डेमुक्त करण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने शासनाकडे पाठविलेल्या अहवालात नमूद करण्यात आली आहे, तर ४६९.९० किमी प्रमुख जिल्हा मार्ग  (एमडीआर)  रस्त्यावर  खड्डे पडले होते. त्यापैकी ४३२.६१ किमीचे रस्ते खड्डेमुक्त करण्यात आले आहे. याची टक्केवारी ९२.०६ टक्के एवढी आहे. यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग अमरावतीविशेष प्रकल्प विभाग अमरावती तसेच दर्यापूर, अचलपूर आदी डिव्हिजनमधील रस्ते खड्डेमुक्त करण्यात आले आहेत.

जिल्ह्यामध्ये ७० कोटींच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. काही मार्गांवर खड्डे शंभर टक्के भरण्यात आले आहेत. उर्वरित कामे सुरू आहेत. विवेक साळवे, अधीक्षक अभियंता, अमरावती