शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
3
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
6
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
7
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
8
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
9
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?
10
Video - हॉटेलमध्ये बॉयफ्रेंडसोबत नवऱ्याने रंगेहाथ पकडताच 'ती' झाली स्पायडरमॅन, थेट छतावरुन...
11
एका हाताला लकवा, नीट ऐकताही येत नाही! तरीही ४४ वर्षांपासून अयातुल्ला खामेनेई कसं सांभाळतात इराणचं सरकार?
12
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
13
Fastag New Rules : एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
14
सलमान खानने केली आमिरची चेष्टा, नवीन गर्लफ्रेंडवरुन म्हणाला; "तो परफेक्शनिस्ट..."
15
“पांडुरंग सगळ्यांच्या मनोकामना ऐकतील”; अजितदादा CM होण्याबाबत सुनेत्रा पवारांचे सूचक विधान
16
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
17
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
18
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
19
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
20
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक

जिल्ह्यातील आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांचे ‘काम बंद’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 22:16 IST

आरोग्य कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी वारंवार निवेदने, आंदोलन करण्यात आले. मात्र, अद्याप त्या प्रलंबित असल्याने सोमवारी जिल्हा परिषद आरोग्य कर्मचाऱ्यांतर्फे काम बंद आंदोलन छेडण्यात आले.

ठळक मुद्देडीएचओ अनुपस्थित : खुर्चीला चिटकविले निवेदन, सीईओंसोबत शिष्टमंडळाची चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : आरोग्य कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी वारंवार निवेदने, आंदोलन करण्यात आले. मात्र, अद्याप त्या प्रलंबित असल्याने सोमवारी जिल्हा परिषद आरोग्य कर्मचाऱ्यांतर्फे काम बंद आंदोलन छेडण्यात आले.जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन दरमहा १५ ते २५ तारखेला होत असल्याने बँक कर्जाची परतफेड, पाल्यांचे शैक्षणिक खर्च, आजारपण आदी समस्यांना सामोरे जावे लागत आहे. ही समस्या मार्गी लावण्याच्या उद्देशाने आरोग्य अधिकारी, कर्मचारी संघटनेच्यावतीने वारंवार प्रशासनाला निवेदने दिली, आंदोलनसुद्धा केले. मात्र, याची दखल अद्याप घेण्यात आली नाही. त्यामुळे नाइलाजास्तव सोमवारी एकदिवसीय काम बंद आंदोलन पुकारण्यात आले.जिल्हा परिषदेच्या आरोग्य कर्मचाºयांनी प्रवेशद्वारासमोर सोमवारी सकाळी ११ पासून आंदोलनाला सुरुवात केली. दुपारी १ वाजता शिष्टमंडळाद्वारे जिल्हा आरोग्य अधिकाºयांना गेलेल्या शिष्टमंडळाला ते भेटले नसल्याने खुर्चीला निवेदन चिटकवण्यात आले. यावर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारी मनीषा खत्री यांच्याशी झालेल्या चर्चेअंती केवळ वेतन वेळेत काढण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले. प्रवासभत्त्याचे काय, असा सवाल शिष्टमंडळाने उपस्थित केला असता, त्यालंबंधी वरिष्ठांचे पत्र आले नसल्याचे सांगण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष देवेंद्र शिंदे, विनोद डोंगरे, बाबूलाल शिरसाट, रजनीकांत श्रीवास्तव, सुभाष चौहान, दीपक खंडाते, विनोद पारोदे, गोकुल बांबल, राजेश पणजकर, अशोक बडोदे, राजू मेश्राम, रामराव पवार, भगवंत शहाकार, पी.एस. तीनखेडे, शालिनी भाकरे, पुरुषोत्तम कुंबलवार, गोपाल ठोसर, प्रकाश राठोड, सुरेंद्र इंगळे, अतुल वानखडे आदी उपस्थित होते.