शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

जिल्हा सामान्य रुग्णालयात 5 दलालांचा वावर, सर्वसामान्यांची होतेय पिळवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2021 17:46 IST

सर्व सामान्यांची फसवणूक, दलालांना बळी न पडू नका

ठळक मुद्देएका महिलेला त्वचेवर अंगभर पांढरे डाग पडल्याने त्या त्वचेसंदर्भात फिटनेस सर्टिफिकेट मिळण्याकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात आल्या. त्या काऊंटरजवळ जाऊन सदर कर्मचाऱ्याला फिटनेस सर्टिफिकेटसंदर्भात विचार केली

अमरावती : जिल्हा सामान्य रुग्णालयात फिटनेस सर्टिफिकेट मिळवून देण्याच्या नावावर दलालांनी सर्वसामान्यांसह कर्मचाऱ्यांची लुबाडणूक चालविली आहे. मात्र, याबाबत तक्रारी होऊनही संबंधित दलालांवर थातूरमातूर कारवाई सोडण्यात येत असल्याने प्रशासनाला नाहक बदनामीला सामोरे जावे लागत असल्याचे चित्र आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात दलालराज अनेक दिवसांपासून सुरू आहे. अशा अनेक घटना घडल्याचा पुरावादेखील लोकमतने गोळा केले आहेत. त्यापैकी एक घटना सोमवारी उघडकीस आली. 

एका महिलेला त्वचेवर अंगभर पांढरे डाग पडल्याने त्या त्वचेसंदर्भात फिटनेस सर्टिफिकेट मिळण्याकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात आल्या. त्या काऊंटरजवळ जाऊन सदर कर्मचाऱ्याला फिटनेस सर्टिफिकेटसंदर्भात विचार केली असता, बाजूलाच बसलेल्या निखिल वाळवे नामक युवकाने त्यांना आर्थिक मोबदला घेऊन सदर सर्टिफिकेट मिळवून देण्याची कबुली दिली. २ हजार ५०० रुपये सदर महिलेकडून उकळले. मात्र, सर्टिफिकेट मिळवून न देता गायब झाला. त्रस्त झालेल्या महिलेने सोमवारी १२.३० वाजता दरम्यान तिच्या मुलीला व जावयाला जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले. सदर व्यक्तीचा शोध घेतला नि त्याला पैसे देण्याची मागणी केली. तेव्हादेखील तो भूल पाडण्याचा प्रयत्न करीत होता. मात्र, जावयाला घाबरून त्याने दुसऱ्यांकडून उधारीवर १४०० रुपये आणून सदर महिलेला दिले. उर्वरित ११०० रुपये देण्याची कबुली त्याने पोलिसांसमक्ष दिली.

दुसरी घटना : एक विद्यार्थी फिटनेस सर्टिफिकेट मिळविण्याकरिता आला असता, तेथीलच एका अन्य दलालाने ते मिळवून देण्याचे २५० रुपये सांगून ३०० रुपये उकळले. सदर विद्यार्थ्याला त्या दलालाने आधी २०० रुपये साहेबांचे आणि ५० रुपये माझी मजुरी, असे सांगितले. मात्र, सर्टिफिकेट विद्यार्थ्याने ५०० रुपयांची नोट दिली असता, ३०० रुपये घेतले. विनवणी केल्यानंतरही त्याने ५० रुपये परत दिले नसल्याची घटनादेखील सोमवारीच घडली.

तिसरी घटना मोर्शी तालुक्यातील एका महिलेला फिटनेस सर्टिफेकेटसंदर्भात निखिल वाळवे याने २ हजार रुपये घेतले. सर्टिफिकेट न दिल्याने विचारणा केली असता सदर महिलेला व तिच्या पतीलासुद्धा दलालाने मारहाण केली होती. या घटनेची तक्रारीदेखील सिटी कोतवाली पोलिसांत करण्यात आली. पोलिसांनी त्या दलाला अटक केली नि सायंकाळी त्याच्या वडिलाने सोडवून आणल्याची माहिती तेथील अपंग युनियनचे अध्यक्ष गणेश टापरे यांनी दिली.

पाच दलालांचा सतत वावरजिल्हा सामान्य रुग्णालयात पाच दलालांचा वावर असल्याची माहिती आहे. तेथे रुग्णांसह अन्य कामानिमित्त येणार्यांची ते वाटच बघत राहतात. अनोळखी व्यक्तींकडून ते काम करून देण्याचे आगाऊ पैसे उकळतात. यावर जिल्हा शल्यचिकित्सकांनी आक्रमक होऊन सदर व्यक्तींची लेखी तक्रार दिल्यास कारवाई करण्याचे आश्वास दिले. तसेच अशा लोकांच्या आमिषासा बळी पडू नका, असे आवाहनदेखील त्यांनी केले.

फिटनेस वा अन्य कुठल्याही सर्टिफिकेटकरिता तपासणी शुल्क १५० रुपये आणि प्रमाणपत्राचे १०० रुपये आकारले जातात. त्याव्यतिरिक्त आगाऊ शुल्क कुणीही देऊ नये, मागणार्याची थेट माझ्याकडे तक्रार दिल्यास संबंधितावर कठोर कारवाई करेन. याबाबच पूर्वी पोलिसांत तक्रारी दिल्या आहेत.

- श्यामसुंदर निकम,जिल्हा शल्यचिकित्सक 

टॅग्स :Amravatiअमरावतीhospitalहॉस्पिटल