शहरं
Join us  
Trending Stories
1
"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप
2
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
3
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
4
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
5
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
6
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
7
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
8
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
9
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
10
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
11
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
12
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
13
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
14
भारतीय लष्कराकडून पुन्हा एकदा ड्रोन स्ट्राईक, अनेक अतिरेकी ठार झाल्याचा दावा
15
युनूस सरकार बघ्याच्या भूमिकेत; ढाक्यात हिंदू व्यावसायिकाची निर्घृण हत्या; हल्लेखोर मृतदेहावर नाचले
16
रस्त्याने जात असताना कारवर पडले दगड, भयंकर भूस्खलनातून थोडक्यात बचावले माजी मुख्यमंत्री
17
रिंकू राजगुरूचा सिंपल पण स्टायलिश लूक, फोटो नाही तर कॅप्शनने वेधलं सर्वांच लक्ष
18
प्रियकरासोबत पत्नी वारंवार पळून जायची; घटस्फोट घेतला अन् दुधाने अंघोळ करुन आनंद साजरा केला
19
Video: IAS अधिकाऱ्याची परीक्षा हॉलमध्ये विद्यार्थ्याला मारहाण; कॉपी केल्याचा आरोप
20
IND vs ENG : 'गलीतली साडेसाती' संपली; जैस्वालचा 'यशस्वी' झेल! दुसऱ्यांदा रेड्डीच्या जाळ्यात फसला क्रॉउली (VIDEO)

जिल्हा काँग्रेसची विधानभवनावर धडक

By admin | Updated: December 12, 2015 00:11 IST

केंद्र व राज्यातील भाजप शिवसेना सरकारच्या कारभाराविरुद्ध रोष व्यक्त करीत जिल्ह्यातील सहा हजार काँग्रेस कार्यकर्त्यांसह शेतकरी, शेतमजुरांनी विधानभवनावर धडक दिली.

अमरावती : केंद्र व राज्यातील भाजप शिवसेना सरकारच्या कारभाराविरुद्ध रोष व्यक्त करीत जिल्ह्यातील सहा हजार काँग्रेस कार्यकर्त्यांसह शेतकरी, शेतमजुरांनी विधानभवनावर धडक दिली. दीक्षाभूमी ते विधानभवनादरम्यान निघालेल्या राज्यस्तरीय मोर्चात अमरावती जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची उपस्थिती जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्या नेतृत्वात लक्षणीय ठरली. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे आश्र्वासनाची पूर्ती तर सोडाच परंतु सर्वसामान्य व गरीब जनतेची कोणतीही अपेक्षा युती सरकाने पूर्ण केली नाही. राज्यातील तमाम जनतेची व शेतकऱ्याच्या पाठीशी आजही काँग्रेस पक्ष ठामपणे उभा आहे. त्यांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीने काढलेल्या मोर्चात शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर करावी, पिकांची नुकसान भरपाई द्यावी, महागाई तातडीने कमी करावी, केशर रेशनधारकांना तातडीने स्वस्त धान्य द्यावे, आरक्षणावर भूमिका जाहीर करावी, संत्रा उत्पादकांना मदत द्यावी आदी मागण्यांसाठी हा धडक मोर्चा विधानभवनावर निघाला. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, आमदार वीरेंद्र जगतापल यशोमती ठाकूर, माजी आमदार केवलराम काळे, नरेंशचंद्र ठाकरे, रावसाहेब शेखावत, सुलभा खोडके, प्रदेश सरचिटणीस संजय खोडके, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सतीश उईके, उपाध्यक्ष सतीश हाडोळे, सभापती गिरीश कराळे, अरूणा गोरले, यशवंतराव शेरेकर, दिलीप महल्ले, पुष्पा बोंडे, छाया दंडाळे आदींचा सहभाग होता. (प्रतिनिधी)