अमरावती : जिल्हा बँकेच्या मतदार यादी कार्यक्रमानंतर आता निवडणूक कार्यक्रमाची उत्सुकता सहकार क्षेत्रातील नेत्यांना लागली आहे. बँकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम २० सप्टेंबरपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे. परिणामी सहकार क्षेत्रात राजकीय हालचालींना वेग आला आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सहकार विभागाने मतदार यादी कार्यक्रम जाहीर केला होता. यानुसार जिल्हा बँकेकडून प्राप्त झालेली प्रारूप मतदार यादी सहकार विभागाने यापूर्वी २० जुलै रोजी प्रसिद्ध केली होती. या यादीत ९६०८ मतदारांचा समावेश करण्यात आला होता. यावर ३० जुलैपर्यंत हरकती व आक्षेप स्वीकारण्यात आले. या दरम्यान १६० जणांचा यादीवर आक्षेप व सूचना नोंदविल्या हाेत्या. यातील आक्षेप व हरकतीवर ९ ऑगस्ट रोजी सुनावणी आटोपली. त्यानंतर १३ ऑगस्ट रोजी यादी प्रसिद्ध करण्यात आली. जिल्हा बँकेची आगामी निवडणूक २१ संचालक पदासाठी होणार आहे. दोन पंचवार्षिकनंतर बँकेची निवडणूक होत असल्यामुळे बँकेवर सत्ता मिळविण्यासाठी सत्ताधारी काँग्रेससह विरोधकांनी कंबर कसली आहे. एकंदरीत या निवडणुकीसाठी सहकार क्षेत्रातील हालचाली गतिमान झाल्या आहेत.
बॉक्स
असे आहेत मतदार संघ
सहकारी नागरी बँक मतदारसंघातून १, वैयक्तिक मतदारसंघ १, सेवा सहकारी सोसायटीतून -१४
महिलांमधून २, ओबीसीतून १, अनुसूचित जाती १, व्हीजेएनटी प्रवर्गातून १ असे २१ संचालक बँकेत राहणार आहेत.
बॉक्स
तालुकानिहाय मतदार
अमरावती ४३, धामणगाव रेल्वे ३३, धारणी १९, अचलपूर ५०, चिखलदरा १६, वरूड ६०, भातकुली ४०, नांदगाव खंडेश्वर ३९, चांदूर बाजार ३०, दर्यापूर ७५ चांदूर बाजार ४१, मोर्शी ६७, अंजनगाव सुर्जी ५६, तिवसा ३६ एकूूण १६८७ मतदार आहेत.