शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळनिधी सर्व तालुक्यांना वितरित

By admin | Updated: February 5, 2015 23:00 IST

जिल्ह्यातील दुष्काळ स्थिती, ४६ पैसे पैसेवारी खरिपासह रबीवर नापीकीची गडद छाया या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्तांकडून ४ फेब्रुवारीला प्राप्त दुसऱ्या टप्प्याचा १२५ कोटी ८४ लाखांचा

अमरावती : जिल्ह्यातील दुष्काळ स्थिती, ४६ पैसे पैसेवारी खरिपासह रबीवर नापीकीची गडद छाया या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्तांकडून ४ फेब्रुवारीला प्राप्त दुसऱ्या टप्प्याचा १२५ कोटी ८४ लाखांचा मदत निधी जिल्हाधिकारी कार्यालयाने सर्व तालुक्यांना अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीद्वारे (बीडीएस) गुरुवार ५ फेब्रुवारीला वितरित केला.खरीप २१४ मध्ये १४ तालुक्यामधील १९८१ गावामधील ४ लाख ४३ हजार ९७४ असा अत्यल्प व बहुभूधारक शेतकऱ्यांच्या शेती व फळपीकाचे नुकसान झाले. त्यानूसार ८ जानेवारी पहिल्या टप्यातील ४० टक्के १२५ कोटी ७९ लाख रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला तर ५ फेब्रुवारीला दुसऱ्या टप्प्यातील ४० टक्के १२५ कोटी ८४ लाख रुपयांचा निधी सर्व तालुक्यांना वितरीत करण्यात आला आहे.जिल्ह्यात ४ फेब्रुवारीपर्यंत ८३ टक्के निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आला आहे. प्रत्यक्षात कित्येक शेतकऱ्यांना हा निधी अद्यापपर्यंत मिळालेला नाही.दुसऱ्या टप्यात अमरावती तालुक्यात ७ कोटी ५० लाख, भातकुली तालुक्याला ६ कोटी २५ लाख, तिवसा तालुक्याला ६ कोटी ७५ लाख, चांदूररेल्वे ६ कोटी, धामणगांव तालुक्यात ७ कोटी ५० लाख नांदगांव खंडेश्वर तालुक्यात ८ कोटी ७५ लाख, दर्यापूर तालुक्याला ८ कोटी, अंजनगाव सुर्जी तालुक्याला ९ कोटी ५० लाख, अचलपूर तालुक्याला १९ कोटी ५० लाख, चांदूर बाजार- १२ कोटी ७५ लाख, मोर्शी - १२ कोटी ५० लाख, वरुड- १३ कोटी ७५ लाख, धारणी- ५ कोटी ७५ लाख, चिखलदरा- १ कोटी ९ लाख रुपये निधी वितरित करण्यात आला आहे.