शहरं
Join us  
Trending Stories
1
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
2
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
3
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
4
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
5
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
6
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
7
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
8
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
9
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
10
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
11
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
12
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
13
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल
14
भारताला चीनपासून सर्वात मोठा धोका, चहुबाजूंनी घेरण्यासाठी विणतोय जाळं, अमेरिकेच्या गोपनीय अहवालातून गौप्यस्फोट 
15
GT ला मोठा धक्का! CSK वर पहिल्यांदाच आली तळाला राहण्याची वेळ; पण जाता जाता त्यांनी MI ला दिलं गिफ्ट
16
निरा डावा कालव्याला भगदाड..! बारामती परिसरात नागरिकांच्या घरात-शेतात पाणीच पाणी
17
धक्कादायक! चेंजिंग रूममध्ये कॅमेरा बसवला होता, महिलांचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ व्हायरल
18
'...तर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही', जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट इशारा
19
"मी एका खोलीच्या घरात राहतो, कर्जबाजारी..."; सीबीआयच्या आरोपपत्रावर सत्यपाल मलिक म्हणाले,...
20
पीएम मोदींचा पाकिस्तान दौरा अन् 2016 चा पठाणकोट हल्ला..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य

घरपोच सकस आहार वितरणावरू न असंतोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2020 05:00 IST

मेळघाटातील धारणी आणि चिखलदरा या दोन्ही आदिवासीबहुल क्षेत्रांमधील अंगणवाडी व मिनी अंगणवाडी केंद्रांत ‘ भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजना’ राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत स्तनदा आणि गरोदर मातांना सकस चौरस आहार मिळावा म्हणून अंगणवाडी केंद्रातून एक वेळचा आहार शिजवून देण्याचे आदेशित आहे . या योजनेंतर्गत प्रतिलाभार्थी ३५ रुपये शासनाकडून अनुदान दिले जाते.

ठळक मुद्देगरोदर, स्तनदा मातांचा प्रश्न बिकट : जिल्हा परिषद प्रशासनाचा लक्षवेध

लोकमत न्यूज नेटवर्कधारणी : येथे सोमवारी आलेल्या उपमुख्य कार्यपालन अधिकारी यांनी सदर योजनेचा थेट लाभ लाभार्थींना अन्न शिजवून प्रत्येक लाभार्थ्याच्या घरी डबे पोहोचून देण्याचे आदेशित केले. अंगणवाडी व मिनी अंगणवाडी आणि त्यांच्या मदतनीस यांच्यात या निर्णयामुळे असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.मेळघाटातील धारणी आणि चिखलदरा या दोन्ही आदिवासीबहुल क्षेत्रांमधील अंगणवाडी व मिनी अंगणवाडी केंद्रांत ‘ भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजना’ राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत स्तनदा आणि गरोदर मातांना सकस चौरस आहार मिळावा म्हणून अंगणवाडी केंद्रातून एक वेळचा आहार शिजवून देण्याचे आदेशित आहे . या योजनेंतर्गत प्रतिलाभार्थी ३५ रुपये शासनाकडून अनुदान दिले जाते.सध्या कोरोना विषाणू संसर्गाच्या अनुषंगाने संपूर्ण देशात संचारबंदी लावण्यात आली. त्यामुळे या योजनेतील लाभार्थी स्तनदा व गरोदर मातांना कच्चा धान्यपुरवठा करण्यात आला होता. त्याप्रमाणे लाभार्थींना गेल्या महिन्यात वाटपसुद्धा केले गेले आहे.कोरोना विषाणूच्या भीतीमुळे सर्वत्र नागरिकांनी स्वत:ला घरात कोंडून घेतले आहे. या दुर्धर आजारपासून स्वत:चे रक्षण करण्यासाठी प्रत्येक जण काळजी घेत आहे. अशा वातावरणात अंगणवाडीमार्फत मदतनिसांद्वारे स्तनदा व गरोदर माता यांना घरपोच डबे पोहचवण्याचे भले मोठे आव्हान निर्माण झाले आहे. अंगणवाडी केंद्रात जवळपास प्रत्येक केंद्रात २० ते ३० लाभार्थी आहेत. अशा प्रत्येक लाभार्थींना डबा पोहचवून देणे आणि तो डबा रिकामा करून आणून दुसऱ्या घरी पुन्हा डबा पोहचवणे असे जिकरीचे काम मदतनिसांकडून केले जाणे अपेक्षित आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही योजना कितपत यशस्वी ठरते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.प्रत्येक अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनासुद्धा कुटुंब आहे. कोरोनाच्या संसर्गाची भीती मदतनिसांना भेडसावत आहे. प्रत्येक घरात जाऊन डबा देणे आणि तो डबा रिकामे होईपर्यंत तिथे प्रतीक्षा करणे आणि नंतर रिकामा झालेला डबा परत घेऊन अंगणवाडी केंद्रात येऊन दुसरा डबा भरून दुसºया लाभार्थीपर्यंत जाणे; यात एखाद्या घरात कोरोना विषाणूचा लागण असल्यास मदतनीस सुरक्षित राहील का, अशी चर्चा सध्या अंगणवाडी सेविकांमध्ये होत आहे.मागील आठवड्यापर्यंत आहार वितरण बंदच होते. मात्र, गरोदर आणि स्तनदा मातांना आहाराची निकड असल्याने वरिष्ठ स्तरावरू न तो आहार घरपोच देण्याचे निर्देश आलेत. वितरणावेळी सोशल डिस्टन्सिंग पाळले जाणार आहे.- प्रशांत थोरात,उपमुख्यकार्यकारी अधिकारी, जि.प.अमरावती