शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

राज्यातील २१५ लाचखोर निलंबनापासून दुरच, संबंधित खात्यांची अनास्था 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2017 17:05 IST

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रचलेल्या सापळ्यात लाच घेताना पकडलेले २१५ लाचखोर अद्यापही निलंबनापासून दूर आहेत. संबंधित विभागांनी त्या लाचखोरांच्या निलंबनाचे आदेश न काढल्याने ते उजळमाथ्याने सरकारी नोकरी करीत आहेत.

- प्रदीप भाकरे

अमरावती : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रचलेल्या सापळ्यात लाच घेताना पकडलेले २१५ लाचखोर अद्यापही निलंबनापासून दूर आहेत. संबंधित विभागांनी त्या लाचखोरांच्या निलंबनाचे आदेश न काढल्याने ते उजळमाथ्याने सरकारी नोकरी करीत आहेत.कुठल्याही सरकारी अधिकारी-कर्मचारी लाच घेताना रंगेहाथ पकडल्यास वा लाचेची मागणी सिद्ध झाल्यास त्याचेविरूद्ध फौजदारी गुन्हा नोंदविला जातो. त्यानंतर अटक करण्यात येते. ज्या अधिकारी-कर्मचा-यांना लाचखोरीच्या प्रमाणात अटक केली जाते त्या अधिकारी-कर्मचा-यांचे संबंधित विभागाने निलंबन करणे अनिवार्य आहे. नव्हे, तर ते कायदेसंगतही आहे. मात्र एसीबीच्या सापळा प्रकरणात ज्या आरोपीविरूद्ध कारवाई केली, त्यापैकी २१५ अधिकारी-कर्मचारी अद्यापही निलंबित केलेले नाहीत. त्यामध्ये मुंबई परिक्षेत्र व ठाणे परिक्षेत्रातील प्रत्येकी १२, पुणे परिक्षेत्रातील १४, नाशिकमधील २५, नागपूरमधील ४३, अमरावती परिक्षेत्रातील ३३, औरंगाबादमधील ३४ व नांदेड परिक्षेत्रातील ४२ आरोपींचा समावेश आहे. ही संपूर्ण माहिती एसीबीच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यात वर्ग १ ते ३५, वर्ग २ ते २६, वर्ग ३ ते १०९, वर्ग ४ ते ७ व इतर ३८ लोकसेवकांचाही समावेश आहे. मुंबईतील चार नगरसेवकांवरही अद्यापपर्यंत निलंबनाची कारवाई झालेली नाही. एकूण २८ सरकारी विभागाने आॅक्टोबर अखेरीस निलंबनाची कारवाई केलेली नाही.

या विभागातील आहेत लाचखोरग्रामविकास - ४६, शिक्षण - ३८, महसूल - ३१, सहकार पणन - १४, समाजकल्याण - १०, आरोग्य - ९, कृषी - ७, गृहविभाग/पोलीस - ०७, नगरविकास - ०१, महावितरण - ६, उद्योग ऊर्जा कामगार - ४, नगरसेवक - ०४, आरटीओ - ४, जलसंपदा - ०५, पदुम - ०२, वित्त - ०३, कौशल्य विकास - ०३, धर्मदाय आयुक्त - ४, नगरपरिषद - ०२, वन - ०३, पाणीपुरवठा - ०२, विधी व न्याय - ०३, महिला बालविकास - २, अन्न नागरी पुरवठा - ०१, राज्य शिक्षण मंडळ - ०१, मागासवर्गीय मंडळ - ०१, एमआयडीसी - ०१, अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ - ०१.

केलेल्या कारवाईचा अहवाल आम्ही संबंधित विभागांना पाठवतो. आरोपींना निलंबित करायचे की कसे? हा त्या संबंधित विभागाच्या अखत्यारितील प्रश्न आहे.- श्रीकांत धिवरे,अधीक्षक, एसीबी, अमरावती परिक्षेत्र

टॅग्स :Amravatiअमरावती