शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

दर्यापूरच्या नगराध्यक्षांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 22:12 IST

नगरपालिकेतील आर्थिक अनियमिततेला नगराध्यक्ष जबाबदार असल्याचा ठपका ठेवत विरोधी पक्षातील १२ सदस्यांनी त्यांच्याविरुद्ध सोमवारी अविश्वास प्रस्ताव दाखल केला. जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन अविश्वास दाखल करून घेण्याची विनंती प्रशासनाला केल्याने राजकारणात खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्दे१२ नगरसेवकांची स्वाक्षरी : राजकीय वर्तुळात खळबळ

लोकमत न्यूज नेटवर्कदर्यापूर : नगरपालिकेतील आर्थिक अनियमिततेला नगराध्यक्ष जबाबदार असल्याचा ठपका ठेवत विरोधी पक्षातील १२ सदस्यांनी त्यांच्याविरुद्ध सोमवारी अविश्वास प्रस्ताव दाखल केला. जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन अविश्वास दाखल करून घेण्याची विनंती प्रशासनाला केल्याने राजकारणात खळबळ उडाली आहे.जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल अविश्वास प्रस्तावाच्या निवेदनावर काँग्रेस, राँका व रिपाइंच्या नगरसेवकांचा समावेश असलेल्या दर्यापूर शहर विकास आघाडीच्या ११ व एक स्वीकृत अशा एकूण १२ नगरसेवकांच्या स्वाक्षरी आहेत. नलिनी भारसाकळे या दर्यापूरच्या नगराध्यक्ष आहेत. तथापि अडीच वर्षांच्या कालावधीत त्यांनी मनमानी कारभार चालविला असून पालिकेतील आर्थिक अनियमिततेला त्या जबाबदार असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला.जिल्हाधिकाºयांनी पालिकेतील आर्थिक अनियमततेची चौकशी करावी व त्यांचे सदस्यत्व रद्द करावे, अशी मागणी जिल्हाधिकाºयांकडे करण्यात आली. यावेळी ३१२ पानांचा प्रस्ताव दाखल करण्यात आला. नगरपालिकेचे उपाध्यक्ष सागर गावंडे, गटनेता दिलीप चव्हाण, आरोग्य सभापती अनील बागडे, शिक्षण सभापती अमोल गहरवाल, महिला व बालकल्याण सभापती निलीमा पाखरे, शादत खाँ अत्ताउल्लाखाँ, इबादुल्लाशाहा अब्दुल्लाशाहा, राजकन्या चव्हाण, किरण गावंडे, ताजखातून अजिज उल्लाखान, प्रतिभा शेवणे, स्वीकृत नगरसेवक विक्रमसिंह परिहार यांच्या अविश्वास प्रस्तावावर स्वाक्षºया आहेत. दरम्यान सोमवरी निवेदन देतेवेळी जि.प.अध्यक्ष नितीन गोंडाणे, तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष सुधाकर भारसाकळे, राकाँचे अरुण गावंडे, अनिल जळमकर उपस्थित होते.कुठलीही अनियमितता नाही. गैरव्यवहारात आपण सहभागी होत नाही. पालिकेवर मुख्यधिकाºयांचे नियंत्रण आहे. सर्व कामकाज नियमाकूल सुरु आहे. अविश्वास प्रस्तावाला सामोरे जाऊ.- नलिनी भारसाकळे,नगराध्यक्ष, दर्यापूरअडीच वर्षांत शहरात कुठलीही विकासकामे झाली नाहीत. मतदार आम्हावर प्रश्नांचा भडीमार करतात. त्यामुळे अविश्वास प्रस्ताव दाखल केला.- दिलीप चव्हाण, गटनेता दर्यापूर शहर विकास आघाडी