लोकमत न्यूज नेटवर्कअंजनगाव सुर्जी : सध्या संपूर्ण देशात कोरोना विषाणूच्या संसर्गाला पायाबंद घालण्यासाठी केंद्र व राज्य सरकार सर्व उपाययोजना करीत असताना अधिकारी-कर्मचारी, पदाधिकारी मात्र गंभीर नाहीत. ग्रामीण भागात मोजकी गावे वगळता, इतर ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन समितीचा बोजवारा उडाल्याचे चित्र आहे.साथरोग प्रतिबंधक कायदा १८९७ अंतर्गत कोरोना विषाणूला पायबंद घालण्यासाठी ग्रामस्तरावर आपत्ती व्यवस्थापन कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे. या कृती दलाला विदेशातून किंवा संसर्गजन्य असलेल्या शहरातून आलेल्या व्यक्तींच्या नावाची नोंद घेणे, अशा व्यक्तींची वैद्यकीय तपासणी झाली असल्याचे खात्री करून घेणे, ते आजारी नसले तरी पुढील १५ दिवस वेगळे राहत असल्याची खात्री करणे, यापैकी कुणाला आजाराची लक्षणे आढळल्यास तात्काळ शासकीय रुग्णालयात तपासणीसाठी पाठवणे, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी आणि तहसीलदार यांना वेळोवेळी माहिती देणे, भटक्या जमातीचे लोक गावात आल्यास त्याबाबत माहिती संकलित करणे, रोगाची लक्षणे आढळल्यास त्यांना रुग्णालयात पाठवणे, प्रतिबंधक उपाययोजनांची नागरिकांना माहिती देणे आदी कामे करावी लागत आहेत. दलाचे अध्यक्ष सरपंच, तर ग्रामसचिव, तलाठी, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक, आरोग्य रक्षक हे सदस्य आणि पोलीस पाटील यांना सचिव म्हणून जबाबदारी पार पाडावी लागते. तथापि, तलाठी आणि सचिव हे सध्या व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून काम हाताळत आहेत. पोलीस पाटील आणि सरपंचसुद्धा घराबाहेर पडायला तयार नाहीत. गटविकास अधिकारी हे रुजू झाले तेव्हापासून बदलीच्या प्रयत्नातच आहेत. अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीमुळे कोरोनाचे संकट आणखी गडद होण्याची चिन्हे आहेत.ेलातूरवरून येत आहे. जवळपास सर्वच गावांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. वरिष्ठांच्या आदेशानुसार ग्रामीण भागात फवारणीची कामे करणार आहोत.-तुकाराम भालके,गटविकास अधिकारीपदाधिकारी घरूनच पाहतात कामकाजअंजनगाव सुर्जी तालुक्यातील ग्रामीण जनतेने पंचायत समितीकरिता सहा व जिल्हा परिषदेसाठी तीन सदस्य निवडून दिले. त्यापैकी अंजनगाव सुर्जी तालुक्याला जिल्हा परिषदचे उपाध्यक्षपद मिळाले. विशेष बाब म्हणजे, पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती घरूनच कामकाज पाहत आहेत. त्यांना तालुक्यातील जनतेची काळजी नसल्याचे चित्र आहे.फोटोसाठी पदाधिकाऱ्यांचा हट्टपंचायत समितीमार्फत तालुक्यातील सर्व ग्रापंचायत हद्दीत कोरोना विषाणूबाधितांच्या सर्वेक्षणासाठी जे जाहिरात फलक लावण्यात आले, त्यावर सभापती व उपसभापती यांचे छायाचित्र असावे, या आटोकाट प्रयत्न करण्यात आले. या बाबीकरिता गटविकास अधिकारी यांच्यावर दबाव टाकल्याचे चांगलीच चर्चा प्रशासनात रंगली आहे.
आपत्ती व्यवस्थापन समितीचा बोजवारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 05:00 IST
साथरोग प्रतिबंधक कायदा १८९७ अंतर्गत कोरोना विषाणूला पायबंद घालण्यासाठी ग्रामस्तरावर आपत्ती व्यवस्थापन कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे. या कृती दलाला विदेशातून किंवा संसर्गजन्य असलेल्या शहरातून आलेल्या व्यक्तींच्या नावाची नोंद घेणे, अशा व्यक्तींची वैद्यकीय तपासणी झाली असल्याचे खात्री करून घेणे, ते आजारी नसले तरी पुढील १५ दिवस वेगळे राहत असल्याची खात्री करणे,
आपत्ती व्यवस्थापन समितीचा बोजवारा
ठळक मुद्देअंजनगाव पंचायत समिती ‘रामभरोसे’ : सचिव, तलाठी यांच्या गावाला दांड्या