शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

नियम बदलल्याने नापसंती ; ‘आरटीई’ च्या २२ हजार जागांसाठी १३५६ अर्ज 

By जितेंद्र दखने | Updated: April 30, 2024 20:42 IST

१० मे पर्यत मुदतवाढ : शिक्षण संचालनालयाचे निर्णयामुळे पालकांना दिलासा.

अमरावती : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के राखीव जागांकरिता दरवर्षी उपलब्ध जागांच्या दुप्पट, तिप्पट अर्ज येतात. परंतु, यंदा राज्य सरकारने प्रवेश प्रक्रियेत बदल केल्याने प्रतिसाद अल्प मिळत असल्याचे वास्तव आकडेवारीवरून समोर आले आहे. जिल्ह्यात २२ हजार ४११ जागा उपलब्ध आहेत. परंतु, त्यासाठी केवळ १ हजार ३५६ हजारांवर अर्ज ३० एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत आले आहेत.  यंदा आरटीई प्रक्रियेंतर्गत विद्यार्थ्याची नोंदणीसाठी १६ ते ३० एप्रिलपर्यत मुदत होती. अशातच बुधवारी पुन्हा आरटीई प्रवेश अर्ज भरण्यासाठी १० मे पर्यत मुदतवाढ दिली आहे.शिक्षण संचालनालयाचे या मुदतवाढीमुळे पालकांना दिलासा मिळाला आहे. 

आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी अमरावती जिल्ह्यातील २२ हजार ४११ जागा रिक्त आहेत.याकरीता आतापर्यत केवळ १३५६ पालकांनीच ऑनलाइन अर्ज केले आहेत. नोंदणीला मिळत असलेला  अल्प  प्रतिसाद लक्षात घेता. पालकांना सरकारी शाळेत आपल्या मुलांना शिक्षण नको,तर खासगी शाळेत शिक्षण हवे असल्याचे या आकडेवारीवरून दिसून येत आहे. शिक्षण विभागाकडून अर्ज भरण्यासाठी पुन्हा येत्या १० मे मुदतवाढ मिळाली असली तरी बदललेल्या नियमावलीनुसार आरटीई प्रवेशासाठी अर्ज भरण्यास पालक इच्छुक नसल्याचे दिसून येत आहे. दृष्टिक्षेपात जिल्ह्याची स्थितीएकूण शाळांची नोंदणी - १९९८रिक्त जागा -२२,४११३० एप्रिलपर्यंत प्राप्त अर्ज -१३५६ आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी १६ ते ३० एप्रिल पर्यंत मुदत देण्यात आली होती. अशातच ही मुदत संपली असल्याने प्राथमिक शिक्षण संचालनालयाने बुधवारी सांयकाळी १० मे पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याचे पत्र जारी केले आहे. पालकांनी दिलेल्या मुदतीत आपल्या पाल्याचे ऑनलाइन अर्ज करावेत.-बुद्धभूषण सोनवणेशिक्षणाधिकारी प्राथमिक

टॅग्स :Amravatiअमरावती