उत्स्फूर्त प्रतिसाद : मेळघाटमध्ये पहिलाच उपक्रम, अपंग जीवन विकास संस्थेचा पुुढाकार धारणी : मेळघाटातील अनेक बांधव अद्यापही अपंग प्रमाणपत्रापासून वंचित राहिल्याचे बघता अपंग जीवन विकास संस्थेद्वारा संचालित जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र, जिल्हा सामान्य रुग्णालय आणि जिल्हा समाज कल्याण कार्यालय यांच्यावतीने किशोर बोरकर यांनी २२ मे रोजी धारणी उपजिल्हा रुग्णालयात अपंग बांधवाकरिता अपंग प्रमाणपत्र वाटण्याचे शिबिर व नोंदणी ठेवली होती. यामध्ये तालुक्यातील हजारोंच्या वर अपंग बांधवांनी लाभ घेतला. त्यापैकी शुक्रवारी जिल्हा शल्य चिकित्सक अरुण राऊत यांच्या चमुने ९०१ अपंग बांधवांची नोंदणी करुन घेतली. येत्या १ महिन्यात सर्व अपंग बांधवांना अपंग प्रमाणपत्र घरपोच देणार असल्याचे सांगितले. किशोर बोरकर यांनी मेळघाटच्या राबविलेला हा पहिलाच उपक्रम असल्याने येथील एकही बांधव प्रमाणपत्राविना राहू देणार नसल्याचे सांगितले. या आधी अपंगांच्या नावावर लाखो रुपयांची उधळण इतर लोकांनी केली. परंतु त्याचा लाभ माझ्या अपंग बांधवांना मिळाला नाही. हेच दुर्दैव बघत मी त्यांना त्यांच्या गावातच प्रमाणपत्र मिळवून देणार, असे सांगितले. अपंग बांधवांना अपंग प्रमाणपत्राकरिता अमरावती येथे जावे लागते म्हणून काही अपंग बांधव प्रमाणपत्रापासून वंचित राहत होते. यानंतर मेळघाटात त्यांना प्रमाणपत्र मिळत असल्याने अपंग बांधवांना अमरावतीत ये-जा करावे लागणार नाही. त्यामुळे २२ मे रोजी ९०१ अपंग बांधवांनी प्रमाणपत्राकरिता नोंदणी केली.या कार्यक्रमाकरिता अपंग जीवन विकास संस्थेचे संचालक किशोर बोरकर, जिल्हा शल्यचिकित्सक अरुण राऊत, तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी, धारणी पंचायत समितीचे बीडीओ जोशी, जावरकर, कावरे प्रकल्प संचालक राजू कोंडे, राजेश परिहार, संजय लायदे, मधुसूदन जाणे, गोविंद खरे, जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्रच्या चमू यांच्यासह उपजिल्हा रुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)वनविभागाने केली अपंग बांधवांना ने-आण करण्याची मदततालुक्यातील प्रत्येक खेड्यापाड्यातील अपंग बांधवांना रुग्णालयात प्रमाणपत्र नोंदणीकरिता ने-आण करण्याकरिता वनविभागाचे मुख्य वनसंरक्षक संजीव गौड यांच्या निर्देशानुसार सहायक उपवनसंरक्षक प्रशांत खाडे यांनी त्यांना वाहनाची व्यवस्था करुन दिली. त्यामुळे प्रत्येक खेड्यातील अपंग बांधव नोंदणीकरिता पोहोचले. याकरिता किशोर बोरकर यांनी मुख्य वनसंरक्षक संजीव गौड यांना भेटून अपंगांसाठी वाहनांची मदत मागितली होती. अपंग बांधवांकरिता जेवणाची व्यवस्थाहजारोंच्या संख्येत अपंग बांधव नोंदणीकरिता रुग्णालयात आले. त्यांच्या जेवणाची व थंड पाण्याची व्यवस्था अपंग जीवन विकास संस्था, अमरावतीचे संचालक किशोर बोरकर यांचेकडून करण्यात आली होती. तपासणीनंतर प्रत्येक अपंग बांधवांना जेवण्याचा डबा देण्यात आला.
धारणीत ९०१ अपंगांंना अपंगत्व प्रमाणपत्र वाटप
By admin | Updated: May 25, 2015 00:26 IST