दलित कुटुंबाचे तिहेरी हत्याकांडअमरावती : अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील दलित कुटुंबातील तिहेरी हत्याकांडाचे आरोपी अद्यापही मोकाट असून या आरोपींना तत्काळ अटक करून कठोर शिक्षा करण्याच्या मागणीसाठी शहरातील विविध संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांना मंगळवारी निवेदन दिले. भाजप दलित आघाडी भारतीय जनता पक्षाच्या दलित आघाडीतर्फे मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन दलित कुटुंबाची हत्या करणाऱ्या आरोपींना कठोर शासन करण्याची मागणी करण्यात आली. अहमदनगर जिल्ह्यातील खर्डा व सोनई येथील दलित तरूणांच्या हत्याकांडानंतर आता त्यात या सामूहिक हत्याकांडाची भर पडली आहे. हा प्रकार निषिध्द असून संबंधितांवर कारवाई व्हायलाच हवी, असे निवेदनात म्हटले आहे. निवेदन देताना भाजप शहराध्यक्ष तुषार भारतीय व भाजप दलित आघाडी अध्यक्ष सुधीर थोरात यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. युवा स्वाभिमान संघटना युवा स्वाभिमान संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन अहमदनगर येथील पाथर्डीच्या दलित हत्याकांडातील आरोपींना पकडून फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. निवेदनाची दखल न घेतल्यास आंदोलनाचा इशारा युुवा स्वाभिमानने दिला आहे. निवेदन देताना गोकुलदास उपाध्याय, जिल्हाध्यक्ष जितू दुधाने, मागासवर्गीय सेलचे शैलेंद्र कस्तुरे, समाधान वानखडे, प्रकाश कठाणे, पी.एन.थोरात, गणेश तेलगोटे, अश्विन उके, आशिष गर्व, सुरेश गायकवाड, नीलेश पवार, राजेश सुंडे उपस्थित होते. बहुजन समाज पार्टीबसपाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन देऊन अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी जवखेडा येथील दलित कुटुंबातील तिहेरी हत्याकांडाचा निषेध करण्यात आला. याप्रकरणी त्वरित कारवाई करून अहमदनगर हा अॅट्रॉसिटीग्रस्त जिल्हा घोषित करावा, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. तत्काळ मागणीची पूर्तता न केल्यास भीमा कोरेगावच्या इतिहासाची पुनरावृत्ती करण्याचा इशारादेखील बसपाच्या कार्यकर्त्यांनी दिला. यावेळी जिल्हाध्यक्ष विद्यासागर वानखडे, राजीव बसवनाथे, दीपक पाटील, मंगेश मनोहरे, याह्या खान पठाण, अनंत लांजेवार, सुधाकर मोहोड, निर्मला बोरकर, प्रभाकर घोडेस्वार, सुदाम बोरकर, भूषण खंडारे, विलास गावंडे, शरद सोनोने, मधुकर गजभिये, सचिन वैद्य, आशा खडसे आदी उपस्थित होत्या.
विविध संघटना 'कलेक्ट्रेट'वर धडकल्या
By admin | Updated: October 28, 2014 22:51 IST