शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बडनेरा आगारातून डिझेल भरणे सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 01:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्कबडनेरा : बडनेऱ्यांच्या एसटी आगारातील डिझेल पंप सहा महिन्यांपासून बंद होता. याचा मोठा मन:स्ताप चालकांना होत असल्याने याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केल्यावर तातडीने याठिकाणचे डिझेलपंप सुरू करण्यात आले. यामुळे चालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. याचसोबत गाड्या धुणेही सोयीचे झाले आहे.बडनेरा एसटी आगारातून मोठ्या संख्येत प्रवाशी वर्ग आहे. या ...

ठळक मुद्देचालकांना मोठा दिलासा : सहा महिन्यांपासून होता बंद

लोकमत न्यूज नेटवर्कबडनेरा : बडनेऱ्यांच्या एसटी आगारातील डिझेल पंप सहा महिन्यांपासून बंद होता. याचा मोठा मन:स्ताप चालकांना होत असल्याने याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केल्यावर तातडीने याठिकाणचे डिझेलपंप सुरू करण्यात आले. यामुळे चालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. याचसोबत गाड्या धुणेही सोयीचे झाले आहे.बडनेरा एसटी आगारातून मोठ्या संख्येत प्रवाशी वर्ग आहे. या आगारातून जवळपास ४२ बसेस इतरत्र धावतात. त्यात लांब पल्ल्यांवर जाणाºया गाड्यांची मोठी संख्या आहे. बीड, लातूर, नांदेड, भोपाळ, बऱ्हाणपूर, नागपूर, छिंदवाडा यासह इतरही मोठ्या शहरांमध्ये या आगारातून बसेस धावतात. आगारात उशिरा रात्री बसेस घेऊन येणाऱ्या चालकांना दुसऱ्या दिवशीच्या प्रवासाकरिता गाड्यांमध्ये डिझेल भरणे अत्यावश्यक असते. मात्र तब्बल सहा महिन्यांपासून बडनेºयाच्या आगारातील डिझेलपंप बंद असल्यामुळे चालकांना दररोज बसमध्ये डिझेल भरण्यासाठी अमरावती आगारात जावे लागत होते. अमरावती आगारातील व बडनेरा आगारातील बसेसची डिझेल पंपावर एकच गर्दी होत होती. एक तासपर्यंत बसेसला डिझेल भरून घेण्यासाठी ताटकळत राहावे लागत होते. थकून आलेल्या चालकाचा बराचसा वेळ डिझेल भरण्यासाठी जात होता त्यांना त्याचा मोठा मन:स्ताप सहन करावा लागत होता. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केल्यावर अवघ्या काही दिवसांतच बडनेरा आगारातील डिझेल पंप सुरू करण्यात आले. यामुळे आगारातील चालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. डिझेल पंप व गाड्या धुण्याची मशीन सुरू झाल्याची पुष्टी एका कर्मचाºयाने केली आहे.गाड्या धुणेही सुरूडिझेलपंप सोबतच गाड्या धुणेही बंद होते. गाड्या धुणेही सुरू करण्यात आले आहे. पाण्याच्या टाक्या नव्याने बसविण्यात आल्या आहे याचेदेखील वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते. गाड्यांमध्ये प्रवाशी उलट्या करतात, तशा अस्वच्छ गाड्या प्रवाशांच्या सेवेत धावत होत्या. यामुळे प्रवासी वर्गांमध्ये संताप व्यक्त होत होता. आता दररोज एसटी गाड्या धुतल्या जात आहे.