इंदल चव्हाण - अमरावती : कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरल्याने संचारबंदीमुळे डबघाईस आलेल्या हॉटेल व्यवसायाला रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा शासनाने दिली आहे. मात्र, मालकासह कर्मचाऱ्यांचे शंभर टक्के लसीकरण अपेक्षित असताना शहरात ७० टक्केच लसीकरण झाल्याचे वास्तव लोकमतने केलेल्या रिॲलिटी चेक दरम्यान पुढे आले आहे.
शहरात मोठ्या हॉटेल्स ६८ असून लहान-मोठ्या सर्व मिळून ४५० आहेत. यामध्ये कामगारांची संख्या १० हजारांवर आहे. सर्व सुरळीत चालू असताना कोरोनाचा शिरकाव झाला आणि हा व्यवसाय धोक्यात आला. हॉटेल, बार, रेस्टॉरेंट व लॉजिंग अमरावती असोसिएशनद्वारा पालकमंत्र्यांना निवेदन देऊन वेळ वाढविण्याची विनंतीसुद्धा करण्यात आली. आता रात्री १० वाजतापर्यंत वेळ वाढवून देण्यात आली. मात्र, हॉटेल्समध्ये काम करणारे सर्व कर्मचाऱ्यांना अद्याप लस मिळालेली नसल्याची माहिती पुढे आली आहे.
बॉक्स
लसीकरण झाले की नाही, तसापणार कोण?
शासनाने हॉटेलची वेळ पूर्वी दुपारी ४ वाजेपर्यंत ठेवली होती. मागणीनुसार ती वाढविली खरी, मात्र, सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण केली की नाही, याची तपासणी करणार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
--
काहींचे लसीकरण पूर्ण, काहींचे बाकी
हॉटेल्स, बार, रेस्टॉरेंट व लॉजिंग असोसिएशनद्वारा तत्कालीन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना हॉटेल कर्मचाऱ्यांचे लसीकरणासाठी वेगळा कॅम्प घेण्याची परवानगी मागितली. मात्र, देण्यात आली नाही. त्यामुळे आम्ही स्वयंप्रेरणेने ७० टक्के कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाले आहे.
--
लस घेतल्यानंतर काहींची प्रकृती बिघडली आणि उपचाराअंती दगावल्याच्या घटना घडल्याचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवून हा प्रकार लसीमुळेच तर झाला नसावा, असा संभ्रम अनेकांच्या मनात निर्माण झाल्याने काहींनी अद्यापही लस घेतलेली नसल्याचे रिॲलिटी चेक दरम्यान उघड झाले आहे.
--
रस्त्यांवर, टपऱ्यांवर आनंदीआनंद
शहरात रस्त्यावर नाश्त्याच्या गाड्या लागतात. त्यावरील काही कामगारांनी लस घेतली, काहींनी अद्याप घेतलेली नाही, असे दिसून आले.
कोट
हॉटेल कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाबाबत प्रसासनाला सुचविले. त्यानुसार ७० टक्के कर्मचाऱ्यांचे लसीकरण झालेले आहे. हॉटेलची वेळ वाढविण्यासाठी पालकमंत्र्यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आल्याने असोसिएशनतर्फे त्यांचे आभार. आता सर्व कर्मचारी कामावर येऊ लागले आहेत.
- सचिन राऊत,
सचिव, हॉटेल, बार, रेस्टॉरेंट व लॉजिंग असोसिएशन, अमरावती