शहरं
Join us  
Trending Stories
1
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
2
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
3
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
4
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
5
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
6
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
7
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
8
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
9
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
10
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
11
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
12
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
13
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
14
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
15
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
16
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
17
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
18
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
19
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
20
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO

अतिसार, अज्ञात तापाची लागण

By admin | Updated: May 25, 2014 23:14 IST

साडेतीनशे लोकसंख्येच्या गावात अतिसार व तापाने कहर केला असून यात गावातील १0 ते १२ रुग्ण विविध रुग्णालयात दाखल झाले आहेत. यातील एक रुग्ण नागपूर येथील लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान दगावला.

सुरेश सवळे - चांदूरबाजार

साडेतीनशे लोकसंख्येच्या गावात अतिसार व तापाने कहर केला असून यात गावातील १0 ते १२ रुग्ण विविध रुग्णालयात दाखल झाले आहेत. यातील एक रुग्ण नागपूर येथील लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान दगावला. या प्रकारामुळे गावकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

आ. बच्चू कडू, जिल्हा परिषद आरोग्य सभापती मनोहर सुने यांनी दिलालपूर येथे भेट दिली. जबाबदार व्यक्तिंवर कारवाईचा इशाराही दिला दिलालरपूर येथे अतिसारा व अज्ञात तापाची लागण झाली आहे. आतापर्यंत १२ रुग्णांना अतिसाराने वेढले असून यामुळे मंगेश शिवानंद जंगम या १९ वर्षीय युवकाचा नागपूर येथील लता मंगेशकर रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. दूषित पाणीपुरवठा, सांडपाणी तसेच पूर्णा धरणातून कालव्यात सोडण्यात येणारे पाणी नाल्यात साचल्यामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे. तर निंभोरा येथे रोगराईसाठीअस्वच्छता कारणीभूत असल्याची कबुली सरपंच स्वाती भाकरे यांनी दिली आहे.

अज्ञात तापाची लागण झालेल्या रूग्णांमध्ये रोहिणी चेंडके (१६), पवन डोंगरे (१७), वेणू दाभाडे, स्नेहा भाकरे, अलका तायवाडे, मधुकरराव तायडे, युवराज डोंगरे (१७), रोशन तायवाडे व मंगेश जंगम (१९) आदींचा समावेश आहे. त्यातील मंगेश जंगम याचा नागपूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. इतर रुग्ण विविध खासगी रूग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत.

येथे पाण्याची टाकी बांधण्यात आलेली नाही. विंधन विहिरीतून पाणी पुरवठा केला जात आहे. ब्लिचिंग पावडरचा वापर केला जात नाही. जुन्या पाईपलाईनमधून अद्यापही पाणीपुरवठा सुरू आहे. सांडपाणी वाहून जाण्यासाठी या गावात एकच नाली आहे. साफसफाई होत नसल्यामुळे नाल्या तुंबल्या आहेत. डासांचा प्रादुर्भाव वाढतो आहे.