शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

धूलिवंदनाला महिलांच्या अब्रूशी खेळ धावत्या वाहनातून दोघींनी घेतल्या उड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2019 22:53 IST

धूलिवंदनाला शहरात टवाळखोरांचा हैदोस पाहायला मिळाला. बडनेरा ते लोणी मार्गावरून लिफ्ट घेणाऱ्या दोन महिलांनी भरधाव वाहनातून उडी घेतल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. याशिवाय विनयभंगाचे तीन, तर मारहाणीचा एक असे गुन्हे विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल झाले आहेत.

ठळक मुद्देशहरात टवाळखोरांचा हैदोस : विनयभंगाचे तीन, मारहाणीचे गुन्हे

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : धूलिवंदनाला शहरात टवाळखोरांचा हैदोस पाहायला मिळाला. बडनेरा ते लोणी मार्गावरून लिफ्ट घेणाऱ्या दोन महिलांनी भरधाव वाहनातून उडी घेतल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. याशिवाय विनयभंगाचे तीन, तर मारहाणीचा एक असे गुन्हे विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल झाले आहेत.होळी सणानंतर दुसऱ्याच दिवशी धुळवडीला शहरवासीयांचा उत्साह पाहायला मिळाला. दरवर्षीच यावेळी मारामारी, अपघाताच्या घटनांची नोंद होते. यंदा मात्र महिलांची बेअब्रू करण्याकडे धटिंगणांचा रोख असल्याचे दिसून आले.फ्रेजरपुरा हद्दीत एक मुलगी घरासमोर रंग खेळत असताना एका विकृताने तिला लज्जा निर्माण होईल, असे कृत्य केले. दुसºया घटनेत मोतीनगरात चौकात काही तरुण रंग खेळताना टवाळखोरपणा करीत होते. दरम्यान एका व्यक्तीने त्यांना हटकले असता, वाद निर्माण होऊन मारहाण झाली. यामध्ये तरुण जखमी झाला.तिसऱ्या घटनेत रंग खेळणाऱ्या काही तरुणांनी पाणी पिण्याचा बहाणा करून एका महिलेचा हात पकडला.चौथ्या घटनेत रंग लावल्याचा जाब विचारणाºया महिलेला जातीवाचक शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. ही घटना तपोवन स्थित पंचशील चौकात घडली. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी प्रकाश धोटे व एका महिलेविरुद्ध गुन्हा नोंदविला.पाचवी घटना ही राजापेठ हद्दीत घडली. एक १७ वर्षीय मुलगी आईला सोडण्यासाठी मोपेड वाहनावरून जात असताना एका तरुणाने तिची छेड काढली. पाचही घटनांमधून यंदाचे धूलिवंदनात टवाळखोरांनी कळस गाठल्याचे दिसून येत आहे.थांबण्याची विनंती करुनही दामटले वाहनबडनेरा येथील रहिवासी २५ वर्षीय महिला गुरुवारी दुपारच्या सुमारास कुंकू कारखान्यातील कामे आटोपून तिच्या मैत्रिणीसोबत पायी लोणीकडून बडनेराकडे येत होती. यादरम्यान एक चारचाकी वाहनात त्या बसल्या. वाहन भरधाव निघाल्यावर केबिनमध्ये चालकासह बसलेल्या तिघांच्या हालचाली व बोलचाल संशयास्पद असल्याचे त्यांना आढळले. त्यांनी चालकाला वाहन थांबविण्याची विनंती केली. मात्र, त्याने वाहन दामटले. त्यामुळे धास्तावलेल्या महिलांनी भरधाव मालवाहू वाहनातून मागच्या बाजूने उडी घेतली. सामाजिक कार्यकर्ते राजेश गुल्हानेसह काही जणांनी त्यांना इर्विनला दाखल केले. या घटनेची तक्रार करण्यासाठी शुक्रवारी लोणी पोलीस ठाण्यात जखमीचे नातेवाईक गेले. पोलिसांनी इर्विनमध्ये जाऊन महिलांचे बयाण नोंदविले. पुढील कारवाई सुरू होती.आईसमोर मुलीची छेडखानीराजापेठ हद्दीतील एक तरुणी मोपेडवर आईला घेऊन मामाकडे जात होती. दस्तुरनगर रोडवर एका तरुणाने त्यांचे वाहन थांबविले. त्यानंतर त्या तरुणाने मुलीच्या अंगाला स्पर्श करून तेथून पळ काढला. या घटनेच्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी आरोपी मनोज परमानंद दारा (रा. दस्तुनगर) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला.मुलीसमोर इसमाचे अश्लील वर्तनफ्रेजरपुरा हद्दीत एक मुलगी कुटुंबीयांसोबत घरासमोर रंग खेळत होती. यादरम्यान एका इसमाने त्या मुलीसमोर अश्लील वर्तन केले. ती पळून घरात गेली. या घटनेच्या तक्रारीवरून फ्रेजरपुरा पोलिसांनी आरोपी नागेश दादाराव धुळे (३०, रा. वडाळी) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.नांदगावपेठेत महिलेचा विनयभंगनांदगावपेठ हद्दीतील एक महिला दिरासोबत रंग खेळत होती. यादरम्यान काही तरुण दिराला रंग लावण्यासाठी आले. दिराला रंग लावून ते निघून गेले. काही वेळानंतर एक तरुण परत आला. त्याने पाणी पिण्यास मागितले आणि महिलेचा हात पकडून तिला ओढाताण केली. महिलेने आरडाओरड केल्याने तो तरुण पळून गेला. नांदगाव पेठ पोलिसांनी या घटनेच्या तक्रारीवरून आरोपी चंद्रशेखर ऊर्फ गोलू मारोती चिनक (२७, रा. रहाटगाव) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला.टवाळखोर तरुणांचा धुमाकूळमोतीनगर चौकात काही टवाळखोरांनी रंगपंचमीला धुमाकूळ घातला. प्रशांत प्रभाकर पोतदार (३२) याने त्या तरुणांना हटकले असता, त्या तरुणांनी प्रशांतला थापडा-बुक्क्यांनी मारहाण केली. एका तरुणाने चाकू काढून प्रशांतवर वार केला. यासोबत शिवीगाळ करून त्यांनी प्रशांतला जिवे मारण्याची धमकी दिली. या घटनेच्या तक्रारीवरून फ्रेजरपुरा पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.