शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

धामणगावचा दंड पोहोचलाय देशभर! गुजरात, आंध्र प्रदेशासह अनेक राज्यांमध्ये पोहोचली काठी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2019 19:02 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत भुजदंड तथा पथसंचलन करताना खांद्यावर घेतला जाणारा दंड (काठी) धामणगावात तयार केला जातो.

 - मोहन राऊत धामणगाव रेल्वे - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत भुजदंड तथा पथसंचलन करताना खांद्यावर घेतला जाणारा दंड (काठी) धामणगावात तयार केला जातो. स्वयंसेवकांकडून त्याला मागणी होत आहे. गुजरात, आंध्र प्रदेशासह देशभरात त्याची ओळख झाली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत दंड (काठी) ला सर्वात महत्त्व आहे. खाकी गणवेश, काळी टोपी, पट्टा, जोडे-मोजे या वेशभूषेला परिपूर्णता येते ती दंडामुळे. या दंडाची निर्मिती मागील अनेक वर्षांपासून धामणगाव शहरातील तहसील कार्यालयासमोर करण्यात येते.

बांबूच्या बुंध्यातून दंडाची निर्मितीशेतातील धुºयावर असलेल्या भरीव बांबूचे बुंधे चार ते पाच हजार रुपयांत कंत्राटी पद्धतीने शेतकºयांकडून खरेदी करून दंडाला आकार देण्याचे काम या क्षेत्रात निष्णात असलेले कारागीर करतात. त्यामध्ये प्रथम या दंडाला सरळ करण्यासाठी जवस तथा सरकीचे तेल लावण्यात येते. यानंतर विस्तवात भाजले जाते. त्यानंतर पाहिजे त्या प्रमाणात सरळ आकार दिला जातो. एक दंड (काठी) तयार करण्यास एक ते दीड तास लागत असल्याची माहिती या कारागिरांनी दिली. ७० ते ८० रुपयांत एका दंडाची विक्री करण्यात येते

गुजरात, आंध्र प्रदेशात मागणीदेशाच्या केंद्रस्थानी असलेल्या नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय आहे. ६८ संघशाखांचे गाव असलेल्या धामणगावचे नागपूर स्थित मुख्यालयाशी दादाराव अडसड यांच्या काळापासून स्नेहबंध आजही कायम आहेत. त्यामुळे येथील दंडाला गुजरात, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये विजयादशमी उत्सव  तसेच अनेक वेळा मागणी नोंदविली जाते. 

सरसंघचालकांचा दंड धामणगावातूनचसरसंघचालक मोहन भागवत हे धामणगाव येथून तयार केलेला दंड (काठी) शाखेत वापरत असल्याची माहिती मिळाली आहे. विभागीय संघचालक चंद्रशेखर राठी हे धामणगाव शहरातील रहिवासी आहेत. त्यांच्यामार्फत येथून हा दंड खरेदी केला जातो.

तळेगावच्या ऐतिहासिक पटात येथील काठीची मागणीकृषिसाहित्य विक्रीचा प्रसिद्ध बाजार असलेल्या तळेगाव दशासर येथील शंकरपटाच्या यात्रेत धामणगाव येथे तयार केलेल्या काठ्यांची सर्वात जास्त विक्री केली जाते. शेतीच्या सर्व कामांत वापरल्या जाणाºया या काठ्या अशोक भैसारे, दिलीप भैसारे, रमेश भैसारे, यादव बोधिले, जीवन साखरे, श्यामराव नंदेश्वर हे करतात.

संघशाखेमध्ये वापरण्यात येणारे दंड (काठी) धामणगाव येथूनच खरेदी केले जातात. आम्हीसुद्धा स्थानिक स्तरावर निर्मित दंड वापरतो. - गोपाल भैया, विदर्भ विद्यार्थी प्रांत प्रमुख

एक दंड (काठी) तयार करण्यास दोन ते तीन तास लागतात. मोठ्या कौशल्याने ही काठी तयार करावी लागते. संघाच्या शाखेसाठी या दंडाची मागणी होते.- शेषराव नंदेश्वर, धामणगाव रेल्वे

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघAmravatiअमरावती