शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

देवमाळी ग्रामपंचायत म्हणते - डेंग्यू घ्या, मलेरिया घ्या, सर्दी-खोकला घ्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2021 05:00 IST

देवमाळी हे गाव पाच किलोमीटर क्षेत्रफळाचे. सहा हजारांवर लोकसंख्या. चार प्रभागात ११ सदस्य  ग्रामपंचायतीची धुरा नागरिकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी नागरिकांनीच निवडून दिले आहेत. कार्यालयासह परिसरातील अनेक ठिकाणी खुल्या प्लॉटवर पाण्याचे तलाव साचले आहे. संततधार पावसामुळे त्या पाण्याला दुर्गंधी सुटली आहे. त्यातून रोगराईला जन्म देण्याचे काम दस्तुरखुद्द ग्रामपंचायत करीत असल्याचे चित्र आहे.

नरेंद्र जावरेलोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : ग्रामपंचायतीवर रहिवासी नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी असताना लगतच्या देवमाळी ग्रामपंचायतीने मात्र नागरिकांच्या जिवाशी खेळ चालविल्याचे चित्र आहे. दस्तुरखद्द ग्रामपंचायत कार्यालय पाण्यात गेल्यापासून जाण्यासही रस्ता नाही. परिसरातील  अवस्था अत्यंत बिकट असल्याने प्रचंड संताप  नागरिकांकडून व्यक्त होत आहे.     देवमाळी हे गाव पाच किलोमीटर क्षेत्रफळाचे. सहा हजारांवर लोकसंख्या. चार प्रभागात ११ सदस्य  ग्रामपंचायतीची धुरा नागरिकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी नागरिकांनीच निवडून दिले आहेत. कार्यालयासह परिसरातील अनेक ठिकाणी खुल्या प्लॉटवर पाण्याचे तलाव साचले आहे. संततधार पावसामुळे त्या पाण्याला दुर्गंधी सुटली आहे. त्यातून रोगराईला जन्म देण्याचे काम दस्तुरखुद्द ग्रामपंचायत करीत असल्याचे चित्र आहे. सुशिक्षित रहिवासी नागरिकांची ग्रामपंचायत असली तरी ग्रामपंचायतीचा डोलारा मूलभूत सोयी-सविधा उपलब्ध करून देण्यात सदस्य थिटा पडले आहे. शुक्रवारच्या पावसामुळे घाणीच्या साम्राज्यात अजून भर पडली आहे. स्वच्छतेचा धडा गिरवणारी ग्रामपंचायत नागरिकांना घाणीच्या साम्राज्यात ठेवत असल्याचे चित्र आहे. 

अशी दिली माहितीग्रामपंचायतीच्या ढेपाळलेला कारभार आणि नागरिकांच्या जीविताचा सुरू असलेला खेळ यावर नागरिकांच्या मनात प्रचंड संताप आणि खदखद सुरू आहे. नोकरदार असल्याने तक्रार करण्यास त्यांच्या मनात भीती आहे. या सर्व बाबी पाहून त्यांनी लोकमत यासंदर्भात आपली व्यथा मांडली.

आजार हवा तर  देवमाळीत चला!कोरोना नंतर प्रत्येक आजारासाठी नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे आरोग्याची काळजी प्रत्येक जण घेत असताना देवमाळी ग्रामपंचायत मात्र नागरिकांच्या जीवशी खेळत असल्याचा प्रकार आहे.  ग्रामपंचायत कार्यालय, केदारनगर, रुक्मिणीनगर, बालाजीनगर, हनुमान नगर, चक्रधर सर्वच ठिकाणी तलाव साचले आहे. दुर्गंधीमुळे डासांचा प्रादुर्भाव डेंगू मलेरिया सर्दी खोकला, ताप या आजारांना निमंत्रण देणारा ठरला आहे.

सुज्ञ नागरिक अन् अज्ञानी ग्रामपंचायतसर्वाधिक सुज्ञ आणि नोकरदार वर्ग देवमाळी ग्रामपंचायतमध्ये रहिवासी असल्याने. सुज्ञ मतदार मतदान करतात. मात्र निवडून दिलेल्या सदस्य त्यांच्या जिवाचा खेळ अज्ञानी होऊन खेळत असल्याचा प्रकार नागरिकांच्या जीवावर बेतनारा ठरला आहे. ग्रामपंचायत कार्यालयात सहा नागरिकांच्या घरातही गढूळ पाण्याचा शिरकाव होत असताना निद्रिस्त ग्रामपंचायतीचा कारभार चर्चेचा विषय ठरला आहे. 

 

टॅग्स :dengueडेंग्यूHealthआरोग्य