शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

देवेंद्र भुयार उवाच; मुलगी जर दिसायला चांगली असेल तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2024 12:34 IST

Amravati : जाहीर सभेत वक्तव्य केल्याबाबत आश्चर्याचा धक्का

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : लग्नाला पोरगी जर पाहिजे असेल, तर पोरा नोकरीवाला पाहिजे. पोरगी स्मार्ट तुमच्या माझ्यासारख्या पोरांना भेटत नाही, नोकरीवाल्यांना भेटते. दोन नंबरची पोरगी कोणाला भेटते, ज्यांचा पानठेला आहे, धंदा, किराणा दुकान आहे, अशा माणसांना दोन नंबरची पोरगी भेटते आणि तीन नंबरचा गाळ राहिलेली पोरगी शेतकऱ्यांच्या पोरांना भेटते. शेतकऱ्यांच्या पोरांचं काही खरं राहिले नाही, अशा वादग्रस्त विधानाचा जाहीर सभेतील एक व्हिडीओ बुधवारी आमदार देवेंद्र भुयार यांचा व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यातही प्रसारमाध्यमांमध्ये हे वृत्त झळकल्याने भुयार चर्चेत आले.

जन्माला येणारं जे लेकरू आहे, ते हे बाळ निघत राहते, तर माय इल्लू पिल्लू त्याच्यापोटी वानराचे पिल्लू असाच हा कार्यक्रम सगळा, असेही आमदार भुयार म्हणाले. त्यांच्या या विधानावरून आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहे. एका बाजूला महायुती सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे, तर दुसरीकडे आमदारांच्या विधानामुळे आता टीका होत आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार भुयार यांचे हे विधान विरोधकांना आयते कोलीत मिळाल्याचे मतदारसंघासह राजकीय बोलले जात आहे. 

महिला उपभोगाचे साधन आहे का? यशोमती ठाकूरअजित पवार आणि सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या आमदारांना कंट्रोलमध्ये ठेवावे, महिलांचे असे वर्गीकरण कोणीही खपवून घेणार नाही. तुम्हाला संसार आणि समाज धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही. महिलांच्या मतांसाठी तुम्ही जीवाचं रान करता, दुसरीकडे वर्गीकरण करून महिलांचा अपमान करताय, त्यामुळे तुमची मानसिकता काय, ते समजत आहे. महिला काय उपभोगाचे साधन आहेत का, अशी टीकावजा प्रतिक्रिया आमदार यशोमती ठाकूर यांनी दिली. 

ते विधान २०१९ मधील तेव्हा वस्तूस्थिती मांडली "मध्य प्रदेशात २०१९ मध्ये एका जाहीर कार्यक्रमात आयोजकांनी दिलेल्या 'त्या' विषयावर केलेले हे विधान आहे. या विधानाचा आता कोठेही संबंध नाही. महिलांचा अपमान किंवा टीका करण्याचा प्रश्नच येत नाही. त्यावेळी पोरांना लग्नाची मुलगी मिळत नव्हती, म्हणून तेव्हाची वस्तुस्थिती मांडली. हा विरोधकांचा मला बदनाम करण्याचा राजकीय डाव आहे." - देवेंद्र भुयार, आमदार मोर्शी.

टॅग्स :Amravatiअमरावती