शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

‘शिवाजी’च्या विजयी जल्लोषात देवेंद्र भुयारांचा भन्नाट डान्स

By गणेश वासनिक | Updated: September 13, 2022 21:54 IST

ढोल-ताशांवर तासभर नृत्य, गुलालाची उधळण, समर्थकांनी आमदारांना खांद्यावर घेऊन साजरा केला आनंदोत्सव

अमरावती : येथील श्री शिवाजी शिक्षण संस्थेची निवडणूक रविवारी पार पडली. या निवडणुकीत प्रगती पॅनलने दमदार विजय मिळविला. पुन्हा अध्यक्षपदी हर्षवर्धन देशमुख हे असणार आहेत. मात्र, हर्षवर्धन देशमुख हे विजयी झाल्याच्या पार्श्वभूमीवर मोर्शी-वरूडचे आमदार देवेंद्र भुयार यांनी भन्नाट डान्स केला. मतदान केंद्रावर रविवारी रात्री तासभर चाललेल्या या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

यंदा शिवाजी शिक्षण संस्थेची निवडणूक वादग्रस्त ठरली. रविवार, ११ सप्टेंबर रोजी शिवाजी बीपीएड महाविद्यालयातील मतदान केंद्रात बोगस मतदान आणि प्रचार करीत असल्याच्या कारणावरून हर्षवर्धन देशमुख आणि नरेशचंद्र ठाकरे यांचे समर्थक आमने-सामने आले होते. मोठा राडादेखील झाला. हाणामारी झाली. पोलिसांनी सौम्य लाठीमार करून परिस्थिती नियंत्रणात आणली. मात्र, हर्षवर्धन देशमुख यांचे खंदे समर्थक असलेले आमदार देवेंद्र भुयार हे रविवारी मतदान केंद्रावर सकाळी ९ वाजतापासून तर मध्यरात्रीपर्यंत तळ ठोकून होते. एवढेच नव्हे तर आमदार भुयार हे हर्षवर्धन देशमुख यांचे निवडणूक प्रतिनिधी म्हणून त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. 

तथापि, प्रगती पॅनलचे उमेदवार विजयी होत असल्याचे निकाल जाहीर होताना आमदार भुयार यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. मात्र, हर्षवर्धन देशमुख यांनी अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली हे जाहीर होताच ‘लाव रे ढाेल-ताशे’ असा जोराचा आवाज आमदार भुयार यांनी दिला. त्यानंतर गुलालाची उधळण आणि विजयी जल्लोषात देवेंद्र भुयारांचा भन्नाट डान्स अनेकांनी कॅमेऱ्यात कैद केला. गुलालाने माखलेल्या आमदार देवेंद्र भुयार यांनी कार्यकर्त्यांच्या खांद्यावर बसून भन्नाट डान्स केला. या उत्साहाच्या भरात केलेला डान्स सध्या समाज माध्यमांवर चांगला चर्चिला जात आहे. आमदार देवेंद्र भुयार हे गत महिन्यात २१ ऑगस्ट महिन्यातच लग्नबंधनात अडकले, हे विशेष. 

टॅग्स :Amravatiअमरावती