शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

देवेंद्र भुयार यांचा जामीन नाकारला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 01:33 IST

जिल्हा परिषदेतील पाणीटंचाईच्या विशेष सभेत सदस्य देवेंद्र भुयार यांनी गटविकास अधिकाऱ्यांवर बॉटल भिरकावल्याची घटना मंगळवारी घडली. शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी देवेंद्र भुयार यांना गाडगेनगर पोलिसांनी अटक करून बुधवारी न्यायालयात हजर केले. त्यांचा जामीन न्यायालयाने नाकारला.

ठळक मुद्देजिल्हा परिषद : शासकीय कामात अडथळा केल्याचे प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा परिषदेतील पाणीटंचाईच्या विशेष सभेत सदस्य देवेंद्र भुयार यांनी गटविकास अधिकाऱ्यांवर बॉटल भिरकावल्याची घटना मंगळवारी घडली. शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी देवेंद्र भुयार यांना गाडगेनगर पोलिसांनी अटक करून बुधवारी न्यायालयात हजर केले. त्यांचा जामीन न्यायालयाने नाकारला.जिल्हा परिषदेच्या सभागृहात घडलेल्या या घटनेत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांमार्फत गाडगेनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली गेली. पोलिसांनी देवेंद्र भुयार यांना घटनास्थळाहून ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम ३५३ अन्वये गुन्हा नोंदविला. अटक करून त्यांना शहर कोतवाली पोलीस ठाण्याच्या कोठडीत ठेवण्यात आले. बुधवारी गाडगेनगर पोलिसांनी देवेंद्र भुयार यांना प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी (३) एस.ए.देशपांडे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना न्यायालयीन कोठडी मिळाली.दरम्यान, देवेंद्र भुयार यांच्यातर्फे वकील शशांक डबरासे यांनी सीआरपीसीच्या कलम ४३७ नुसार न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. त्यांनी उच्च न्यायालयाचे दाखले देत न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, भादंविच्या कलम ३५३ गुन्ह्याचा खटला जिल्हा व सत्र न्यायालयातील असला तरी त्यामध्ये जेएमएफसी न्यायालयास जामीन देण्याचे अधिकार आहे.फाशी किंवा आजीवन कारावास अशा प्रकारची मोठी शिक्षा या गुन्ह्यात नसल्यामुळे आपण या कमी शिक्षेच्या खटल्यात आरोपीला जामीन द्यावा, अशी बाजू वकील शशांक डबरासे यांनी न्यायालयासमोर मांडली. या गुन्ह्याचा तपास सुरू असल्यामुळे न्यायालयाने देवेंद्र भुयार यांचा जामीन नाकारला. 

टॅग्स :Policeपोलिस