शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बेलोरा विमानतळावर ३९.३३ कोटींच्या निधीतून विकासकामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 00:49 IST

जिल्ह्याच्या विकासात मैलाचा दगड ठरू पाहणाऱ्या बेलोरा विमानतळावर ३९.३३ कोटी रुपयांच्या निधीतून विविध विकासकामे होणार आहेत. यामध्ये 'रन-वे'ची लांबी वाढविणे, अप्रॉन जीएसई, ड्रेनेज व्यवस्था, अप्रोच रस्ते निर्मिती आदी कामांचा समावेश असणार आहे.

ठळक मुद्दे३० एप्रिल रोजी निविदा उघडणार : रन-वे बांधकाम, अप्रॉन जीएसई

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्याच्या विकासात मैलाचा दगड ठरू पाहणाऱ्या बेलोरा विमानतळावर ३९.३३ कोटी रुपयांच्या निधीतून विविध विकासकामे होणार आहेत. यामध्ये 'रन-वे'ची लांबी वाढविणे, अप्रॉन जीएसई, ड्रेनेज व्यवस्था, अप्रोच रस्ते निर्मिती आदी कामांचा समावेश असणार आहे. ३० एप्रिल रोजी निविदा उघडणार असून, त्यानंतर विकासकामांसाठी एजन्सी नेमली जाणार आहे.महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या नियंत्रणात बेलोरा विमानतळाचे विविध विकासकामे पूर्णत्वास जाणार आहे. बेलोरा विमानतळावर प्रस्तावित विकासकामांच्या निर्मितीकरिता यापूर्वीच निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. ६ मार्च २०१९ रोजी निविदा प्रकाशित करण्यात आल्या होत्या. २६ मार्च रोजी प्री-बीड बैठकीनंतर २८ मार्च रोजी बीड सादर करण्यात आले. आता २९ एप्रिल रोजी कागदपत्रांचे डाऊनलोडींग आणि कागदपत्राचे अंतिम सादरीकरण केले जाईल. तसेच मुंबई येथील महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या कार्यालयात ३० एप्रिल रोजी अंतिम निविदा उघडल्या जातील. निविदेअंती अटी, शर्तीनुसार एजन्सी नेमली जाणार आहे. त्यानंतर नियमानुसार एजन्सीला १२० दिवसांत सिव्हील बांधकाम पूर्ण करावे लागणार आहे. विशेषत: नाईट लॅडिंग, रन-वे लांबी वाढविण्याच्या कामाला प्रारंभ होणा आहे. सांडपाणी व्यवस्थापन, अंतर्गत व बाह्य रस्ते निर्मिती, संरक्षण भिंतीचे बांधकाम केले जाणार आहे. विमानांच्या नाईट लॅडिंगसंदर्भात विमानतळ परिसरात ११ केव्ही क्षमतेचे वीज उपकेंद्र उभारले जाणार आहेत.अमरावती लोकसभा निवडणूक पार पडल्याने आचारसंहिता शिथिल झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने बेलोरा विमानतळाच्या विविध विकासकामांच्या निविदा ३० एप्रिल रोजी उघडण्याचे निश्चित केले आहे. लवकर बेलोरा येथून विमान सेवा सुरू होईल.- सुनील देशमुख, आमदारटर्मिनस बिल्डिंग, एटीएस टॉवरची उभारणीबेलोरा विमानतळाहून विमानसेवा सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. त्यानुसार महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने विकासकामांच्या निविदा उघडण्याची तयारी चालविली आहे. यापूर्वीच माती परीक्षण, विद्युत सर्वेक्षण आटोपले आहे. तर, राईट्स कंपनीकडून टर्मिनस बिल्डिंग, एटीएस टॉवर उभारणीचा नकाशा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार लवकरच उभारणी केली जाणार आहे.

टॅग्स :Airportविमानतळ