शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

आमदारांना करता येणार नाही सासूरवाडीच्या गावांचा विकास

By admin | Updated: May 29, 2015 00:33 IST

केंद्र शासनाच्या खासदार आदर्शग्राम योजनेच्या धर्तीवर राज्यात आमदार आदर्शग्राम योजनेची घोषणा राज्य शासनाने नुकतीच केली होती.

जितेंद्र दखने   अमरावतीकेंद्र शासनाच्या खासदार आदर्शग्राम योजनेच्या धर्तीवर राज्यात आमदार आदर्शग्राम योजनेची घोषणा राज्य शासनाने नुकतीच केली होती. एका विधानसभा आणि विधान परिषदेच्या आमदाराला सन २०१९ पर्यंत तीन ग्रामपंचायतींना ‘आदर्शग्राम’ म्हणून विकसित करावे लागणार आहे. या योजनेनुसार विधानसभा व राज्यसभेच्या एकूण ३६६ सदस्यांच्या माध्यमातून सुमारे एक हजार ९८ गावांचा कायापालट अपेक्षित आहे. मात्र, ही गावे निवडताना आमदारांना स्वत:चे गाव अथवा सासूरवाडीच्या गावाची निवड करता येणार नाही, असे धोरण वरिष्ठ पातळीवर ठरविण्यात येत आहे. त्यामुळे सासुरवाडीच्या गावांचा विकास करण्याचे आमदारांचे मनसुबे आता पूर्ण होणार नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदार आदर्शगाव योजनेची घोषणा केली होती. या योजनेच्या धर्तीवर राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार आदर्शगाव योजना कार्यान्वित केली. त्यानुसार ग्रामविकास मंत्रालयाच्यावतीने योजनेची मार्गदर्शक तत्त्वे नुकतीच जाहीर करण्यात आली आहेत. या मार्गदर्शक तत्त्वांनुसार एका आमदाराला मतदारसंघातील तीन ग्रापं २०१९ पर्यंत आदर्श करावयाच्या आहेत. ग्रामपंचायतींची निवड करताना गावाची लोकसंख्या किमान १ हजार असणे आवश्यक आहे. आमदारांना स्वत:चे किंवा पत्नीचे गाव यासाठी निवडता येणार नाही, असे या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये नमूद करण्यात आले आहे. शहरी मतदारसंघ असणाऱ्या आमदारांना नजीकच्या एका ग्रामपंचायतीची निवड करता येईल.विधान परिषद सदस्यांना त्यांच्या इच्छेप्रमाणे कोणत्याही जिल्ह्यातील ग्रामपंचायतीची निवड करता येईल.विकास करताना विविध योजनांची अंमलबजावणी करावी लागेल. आमदार निधीचा वापर करता येईल. शासनाकडून अतिरिक्त निधी दिला जाणार आहे. ग्रामविकास विभाग समन्वय साधणार आहे.