शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट सीटीत शहराचा विकास; खेडे मात्र भकास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 22:49 IST

रस्ते, वीज व निवारा या मूलभूत सुविधाही अजून पूर्णत्वास गेल्या नाहीत, ही व्यथा आहे वडुरा या गावाची. स्मार्ट सिटीत शहराचा विकास होत असला तरी खेडे मात्र, स्वातंत्र्याच्या ७१ वर्षांनंतरही भकास आहेत.

ठळक मुद्देव्यथा वडुरा गावाची : स्वातंत्र्याच्या ७१ वर्षांनंतरही विकासापासून कोसो दूर

संजय जेवडे।लोकमत न्यूज नेटवर्कनांदगाव खंडेश्वर : रस्ते, वीज व निवारा या मूलभूत सुविधाही अजून पूर्णत्वास गेल्या नाहीत, ही व्यथा आहे वडुरा या गावाची. स्मार्ट सिटीत शहराचा विकास होत असला तरी खेडे मात्र, स्वातंत्र्याच्या ७१ वर्षांनंतरही भकास आहेत.वडुरा या गावातील ग्रामपंचायतीची इमारत पुरातन असून, शिकस्त झाली आहे. भिंतीला तडे गेले असून, ती केव्हा कोसळेल याचा नेम नाही. पावसाचे पाणी गळू नये म्हणून छताला प्लास्टिकचे कव्हच लावले आहे. येथूनच या गावाच्या दुर्दशेची खरी सुरूवात होते. तेथील लोकसंख्या १,३२७ असून, गावात ४८४ कुटुंबे राहतात. त्यांची उपजिविका शेती व शेतमजुरीवरच अवलंबून आहे. त्यात पारधी बेड्यावरील ९० टक्के लोक केवळ मजुरीवर अवलंबून आहेत.येथील इंदिरा आवास झोपडपट्टीत अजून विद्युत पोल नसल्याने पथदिव्यांची सोय नाही. नागरिकांनी व ग्रामपंचायतीने केबल टाकून पथदिवे लावण्याचा प्रयत्न केला. पण, महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी पोल शिवाय पथदिवे लावता येत नाही या सबबीखाली ते काढून नेले. त्यामुळे तेथील रस्त्यावर अंधार आहे व रस्त्याने पायदळही चालणे कठीण झाले आहे. या गावातील नाल्यांचे बांधकाम बरेच जुने व अरूंद असल्यामुळे पावसाचे पाणी घरात शिरते. त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. नाली बांधकामासाठी निधीची गरज आहे. मधुकरराव शेटे यांच्या घरापासून ते गोठाण नाला आणि गोविंदराव चोखट यांच्या घरापासून ते पुलाच्या नाल्यापर्यंत नाली बांधकाम गरजेचे आहे. येथील कोंडवाड्याच्या भिंती कोसळल्याने ग्रामपंचायतीचे उत्पन्न बुडाले. येथून महाविद्यालयात जाणारे विद्यार्थ्यांना व १२ वी पर्यंतच्या शिक्षणासाठी गावात येणाºया विद्यार्थ्यास बसेसची सोय नाही. येथील वीजपुरवठा लोणी (टाकळी) विद्युत केंद्रावरून होतो. भारनियमनाव्यतिरिक्त कृषीधारकांना वेळापत्रकानुसार वीजपुरवठा होत नाही आदी समस्यांनी या गावाला वेढले आहे. पाच वर्षांपासून ओ.बी.सींना घरकूल मिळाले नाही. येथील भीमराव सहारे हे निवाºयाअभावी समाज मंदिरात वास्तव्याला आहेत. गजानन सहारे (अपंग), शंकर ठाकरे, ज्ञानेश्वर राऊत, रतन नेवारे, जयंताबाई राऊत, भाऊराव राऊत यांचे कुटुंब कुडाच्या घरात राहतात, असे दत्ता बेलोरकर यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.ग्रामपंचायतीचे बांधकाम, इंदिरा आवास प्लॉटमध्ये विद्युत पुरवठ्यासाठी पोल, शेतात जाणारे पांदण रस्ते तयार करण्यासाठी विविध निधीची आवश्यकता आहे.- कुंजलता बेलोरकर,सरपंच, वडुरागावातील रस्ते व स्मशानभूमीत जाणाºया रस्त्यासाठी निधी उपलब्ध व्हावा व पारधी बांधवांसाठी पूरक व्यवसाय व रोजगाराची संधी शासनाने उपलब्ध करून द्यावी.- चंचलाबाई सातंगे,उपसरपंच, वडुराग्रामपंचायतीचे उत्पन्न कमी आहे. त्यातून पाणीपुरवठा, वीज देयके, कर्मचारी वेतन व नाल्या सफाई यावर खर्च होतो. मोठी विकासकामे निधीशिवाय होऊ शकत नाहीत.- नीतेश गेडाम,ग्रामसेवक, वडुरा