शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या थडग्यावर विकासाचे मनोरे

By admin | Updated: May 31, 2015 00:04 IST

मोर्शी-वरुड तालुक्यात शेतकऱ्यांना हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहे. कर्जदार शेतकऱ्यांकडे भाडोत्री गुंड पाठवून ...

राजू शेट्टी : गडकरींनी करावा खुलासा, पत्रपरिषदेत मागणीवरूड : मोर्शी-वरुड तालुक्यात शेतकऱ्यांना हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहे. कर्जदार शेतकऱ्यांकडे भाडोत्री गुंड पाठवून वसूलीचे सत्र सुरु आहे. यातूनच शेतकरी आत्महत्या करीत आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जाण्यासही मागेपुढे पाहणार नाही. राज्यात विरोधी पक्ष मूग गिळून बसला आहे. आता आम्हीच सत्ताधारी आणि आम्हीच विरोधी असल्याने शेतकऱ्यांच्या हितासाठी दबावगट तयार करुन विविध योजना मंजूर करणे आवश्यक आहे. विकास कामाला आमचा विरोध नाही. परंतु उद्योगाच्या नावाखाली आवाज नाही, सरकार शेतकऱ्यांच्या थडग्यावर विकासाचे मनोरे उभारत असेल तर ते थडगे कुणासाठी याचा खुलासा ना. नितीन गडकरी यांनी करावा असा आरोप खा. राजू शेट्टी यांनी येथे आयोजित पत्रपरिषदेत केला.ते पुढे म्हणाले, आमचे सरकार घोटाळेबाज नाही. शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी सोफियाला दिले. परंतु शेतकऱ्याला काय मिळाले. आय.आर.बी.चा टोल नाका वारेमाप वसूली करीत आहे. शासनाने वरुड मोर्शीतील वाहनधारकांना सर्व्हिस रस्ता टाकून द्यावा, अन्यथा टोलमुक्त करावे असेही त्यांनी सांगितले . दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी कर्जबाजारी झाला . कर्जाच्या वसूलीसाठी येणाऱ्या फायनान्स कंपनीच्या गुंडांवर कुठलीही कारवाई होत नाही. उलट शेतकऱ्यांना तगाद्यामुळे आत्महत्या करावी लागते. आता स्वाभीमानी शेतकरी संघटना हे खपवून घेणार नाही असे स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे खा. राजू शेट्टी यांनी सांगितले. भूमिअधिग्रहनाबाबत बोलतांना ते म्हणाले, शेतकरी विरोधी धोरणाला सरकारला कधीही पाठिंबा देणार नाही. उद्योगपतींना देण्यात येणाऱ्या जमिनीसाठी भूमिअधीग्रहण कायदा आणू पाहत असेल तर आम्ही स्वस्थ बसणार नाही . कर्ज मुक्ती संषर्घ यात्रा सुरुच राहणार असून शेतऱ्यांना न्याय मिळेपर्यंत शांत राहणार नाही. ना. नितीन गडकरी यांचे जरी समर्थन असले तरी आमचा स्वत:चा पक्ष आहे आमची ध्येय धोरण असल्याने शेतकऱ्यांच्या हितासाठी सत्तेतून बाहेर पडावे लागले तरी चालेल असेही त्यांनी यावेळी ठणकावून सांगितले. यावेळी सदाभाऊ खोत तसेच वस्त्रोउद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविंकात तुपकर सुध्दा उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)