मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : विविध समस्यांसंदर्भातअमरावती : स्मार्ट सिटी प्रकल्पासह अस्तित्वात असलेल्या अमरावती शहराचा चौफेर विकास हाती घेण्याचा संकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. अमरावती शहराची ओळख सॅटेलाईट सिटी म्हणून या निमित्ताने करण्याचा निर्णयही त्यांनी बैठकी दरम्यान घेतला. अमरावती जिल्ह्यातील विविध समस्यांसंदर्भात नागपूर स्थित विधानभवन सभागृहात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली यावेळी ते बोलत होते. जिल्ह्यात अनुशेषांतर्गत ३२ सिंचन प्रकल्प आहेत. त्यापैकी ८ प्रकल्पाचे घळभरणीचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित प्रकल्पाच्या घळभरणीचे काम येत्या तीन वर्षात टप्प्या टप्प्याने पूर्ण करण्यात येईल, असे सांगून अनुशेषांतर्गत सिंचना प्रकल्पाची कामे पूर्ण करण्यासाठी कालबध्द कार्यक्रम हाती घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. विद्युत पंप बसविण्यासाठी १०,६९२ एवढा लक्षांक असून ३,४७३ जोडण्या पूर्ण झाल्या आहेत. उर्वरित मार्च,२०१६ पर्यंत होईल. सोलरसाठी १७०० सोलर पंप मंजूर असून २०३ अर्ज प्राप्त झाले आहेत. महसूल विभागातील रिक्त जागा जवळपास पूर्ण भरण्यात आली आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येणारी पदे अगोदर विदर्भात नंतर मराठवाडयात भरली जातील असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. जलसंपदा विभागातील १२०० ज्युनिअर इंजिनिअरची पदे भरण्याची परवानगी देण्यात आल्याचेही यावेळी सांगण्यात आले. मेळघाटातील आरोग्य आणि विजेचा प्रश्न सोडविण्यासाठी वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची १५ पदे भरण्यात आली आहेत. मध्यप्रदेशातील नेपानगर पासून धारणी पर्यंत ५५ कि.मी. ट्रान्समिशन लाईनचे काम मार्च, २०१५ पासून सुरु झाले असून १६ कोटी ५७ लक्ष रुपये व उपकेंद्राकरिता ८ कोटी ९२ लक्ष रुपये असा एकूण २५ कोटी ४९ लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. जून २०१६ पर्यंत काम पूर्ण होणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. बैठकीस पालकमंत्री प्रविण पोटे, वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर, खासदार रामदास तडस, खासदार आनंदराव आडसूळ, आमदार सर्वश्री बच्चू कडू, डॉ.अनिल बोंडे, डॉ.सुनिल देशमुख, रमेश बुंदिले, विरेंद्र जगताप, यशोमती ठाकूर, प्रभुदास भिलावेकर, मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रिय,अतिरिक्त मुख्य सचिव दिनेशकुमार गोयल अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
‘स्मार्ट सिटी’सोबतच अस्तित्वात असलेल्या शहरांचाही विकास
By admin | Updated: December 13, 2015 00:09 IST