गोवा संघाला नमविले : कुलगुरुंकडून खेळाडूंवर कौतुकांचा वर्षावअमरावती : भोपाळ येथील बरकतुल्लाह विद्यापीठात नुकतेच पार पडलेल्या पश्र्चिम विभाग आंतर विद्यापीठ फुटबॉल स्पर्धेत येथील संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ (पुरुष) संघाने गोवा संघाला नमवून देदिप्यमान कामगिरी बजावली आहे.विद्यापीठाच्या फुटबॉल (पुरूष) संघाने पात्रता फेरीच्या अंतीम सामन्यामध्ये फुटबॉलचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या गोवा विद्यापीठाच्या संघाचा टायब्रोकरमध्ये ५-४ अशा गोल फरकाने आश्चर्यजनक पराभव करून पात्रता फेरी गाठली आहे. सामन्याच्या प्रारंभी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या संघाने एन.आय.टी. विद्यापीठ, भोपाळ (५-०) एम.एस.विद्यापीठ, बडोदा (३-१) जिवाजी विद्यापीठ, ग्वालीयर (३-०) आणि सौराष्ट्र विद्यापीठ, गुजरात (१-०) अशा गोल फरकाने या विद्यापीठांचा पराभव करून हा संघ अखिल भारतीय आंतर विद्यापीठ सामन्यांकरिता पात्र ठरलेला आहे. अतिशय उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून हा विजयश्री खेचून आणला आहे. कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांनी खेळाडूंचे कौतूक करून या संघाच्या निवड समितीच्या सदस्यांचे अभिनंदन केले आहे. या संघाचा सराव करून घेण्याकरिता विद्यापीठाच्यावतीने युवा व तज्ञ प्रशिक्षक मुझम्मील आफताब तर व्यवस्थापक म्हणून नानासाहेब सपकाळ, भाऊसाहेब लहाने यांची नेमणूक केली होती. खेळाडूंचे सर्वत्र कौतुक होत आहे. (प्रतिनिधी)
विद्यापीठ फुटबॉल संघाची देदिप्यमान कामगिरी
By admin | Updated: January 12, 2017 00:12 IST