एसीबीची कारवाई : पोलीस विभागात खळबळतिवसा : कुऱ्हा पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस उपनिरीक्षक मोहन नागोराव भटकर (५६, रा. कुऱ्हा) याच्यासह वाहतूक शाखेतील जमादार राहुल सांळुखे (५२, रा. कुऱ्हा) याला ३ हजारांची लाच घेताना सोमवारी सायंकाळी लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने अटक केली. कुऱ्हा पोलीस ठाण्यांतर्गत परिसरात शंकर बुरे व उत्तम मेश्राम यांचा वाद झाला होता. त्यासंदर्भात एनसी तक्रारीवरून भादंविच्या कलम ३२४ अन्वये गुन्हा दाखल न करता केसचा निपटारा करण्याकरिता भटकर व सांळुखेने ३ हजारांची लाच मागितली होती. बुरेच्या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने सापळा रचून एएसआय मोहन भटकर व जमादार राहूल सोंळकेला अटक केली आहे. पोलीस अधीक्षक एम. डी. चिमटे, अप्पर पोलीस अधीक्षक एस. एल. मुंढे व पोलीस उपअधीक्षक आर. बी. मुळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक जीवन भातकुले, पुजा खांडेकर, राजवत आठवले, पोलीस शिपाई गजेंद्र, धिरज, अक्षय, विक्रम, जाकीर, भडांगे यांनी ही कारवाई केली. (प्रतिनिधी)
लाचखोर एएसआयसह पोलीस जमादार अटकेत
By admin | Updated: September 22, 2015 00:17 IST