शहरं
Join us  
Trending Stories
1
बळीराजाची खरी दिवाळी...! जीएसटी कपातीचा शेतकऱ्यांना काय-काय फायदा होणार? एकदा पहाच... 
2
वाट माझी बघतोय रिक्षावाला संघटना खूश होणार; कार, दुचाकींवर लागणार एवढा जीएसटी...
3
GST: मोठी घोषणा! २२ सप्टेंबरपासून नवीन जीएसटी दर लागू होणार; काय स्वस्त काय महागले...
4
GST Rate Cuts News: आरोग्य विमा, जीवन विम्यासह ३३ औषधांवर शून्य GST; विद्यार्थ्यांना काय...? 
5
दिल्ली पोलीस पुण्यात आले, बेड्या ठोकून घेऊन गेले; बलात्कार प्रकरणी अभिनेता आशिष कपूरला अटक
6
कामगारांनो, आता ९ तासांऐवजी १२ तास काम, मात्र...; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
7
दादर टर्मिनसबाहेरील पार्किंगमध्ये दुचाकी पेटल्या; १०-१२ दुचाकी खाक
8
भिवंडीत उड्डाणपुलावर दोन भरधाव कारचा अपघात, दुचाकीस्वाराचा थेट रस्त्यावर पडून दुर्दैवी मृत्यू
9
यमुनेचा रौद्रावतार! पुरग्रस्तांच्या छावण्यांतही पाणी घुसले; २०१३ ची पातळी ओलांडली
10
मराठा आंदोलन संपताच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर; घेतले गणपतीचे दर्शन, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
11
जिओ कंपनी उदार झाली...! ९ वर्ष झाल्याचे सेलिब्रेशन करणार; एक महिन्याचा रिचार्ज फ्री देणार...
12
जीएसटी परिषदेबाबत पहिली बातमी! २५०० रुपयांच्या आतील चप्पल, बुटांवर ५ टक्के कर : रिपोर्ट
13
...तोपर्यंत उपोषण, शासन निर्णय फाडणे, होळी करणे थांबवा; छगन भुजबळांचं OBC कार्यकर्त्यांना आवाहन
14
प्रमोशन दिलं नाही, महिला कर्मचारी बॉसवर संतापली! 'असा' बदला घेतला की सगळेच अवाक् झाले
15
सावधान! ChatGPT सोबत गप्पा मारताय? तुमची प्रत्येक गोष्ट ऐकू शकतात पोलीस
16
येत्या काही महिन्यात देशात राजकीय बदल होणार; ‘हायड्रोजन बॉम्ब’चा अर्थ काय? २ नेत्यांचे मोठे दावे
17
उत्तर प्रदेशात एक खाजगी बस पाण्यात उलटली, एका मुलासह दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
18
निर्बंधांचा परिणाम...! सौदी अरेबियाने या भारतीय कंपनीला कच्च्या तेलाचा पुरवठा रोखला
19
पाण्याच्या खदाणीत मिळाला महिलेसह मुलीचा मृतदेह; कासारवडवलीतील घटना
20
जुलैपासून टेस्लाने किती बुकिंग मिळविली? एलन मस्कनाही अपेक्षित नव्हते...

पालकमंत्र्यांसह देशमुखांनी वाढविला पदाधिकाऱ्यांचा उत्साह

By admin | Updated: March 10, 2017 00:21 IST

तब्बल १९ वर्षानंतर महापालिकेत भाजपला एकहाती सत्ता मिळवून देण्यात सिंहाचा वाटा असणारे पालकमंत्री प्रवीण पोटे आणि .....

खुल्या जीपमधून मिरवणूक : ढोल-ताशांच्या निनादात विजयोत्सवअमरावती : तब्बल १९ वर्षानंतर महापालिकेत भाजपला एकहाती सत्ता मिळवून देण्यात सिंहाचा वाटा असणारे पालकमंत्री प्रवीण पोटे आणि आ.सुनील देशमुख यांनी गुरूवारी महापालिकेत उपस्थित राहून नवनियुक्त महापौर, उपमहापौरांसह पदाधिकारी व नगरसेवकांचे अभिनंदन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लोकाभिमुख निर्णयामुळे भाजपला निर्भेळ यश मिळाल्याचे सांगत उभय नेत्यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना पारदर्शक कारभाराचा मूलमंत्र दिला. महापालिकेला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी आपण महापालिकेच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली. फुगडी खेळून विजयोत्सवअमरावती : पालकमंत्री पोटे यांनी थेट सभागृह गाठून नरवणे आणि टिकले यांच्यासह नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. महापौरांच्या कक्षात उभय नेत्यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले तथा त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी माजी महापौर मिलिंद चिमोटे, भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी, शहराध्यक्ष जयंत डेहणकर, किरण पातुरकर आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. एकतर्फी विजयश्री मिळवून महापौरपदी विराजमान झालेले संजय नरवणे आणि नवनिर्वाचित उपमहापौर संध्या टिकले यांची महापालिका आवारात ढोल-ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. भाजपक्षाचे सर्व नगरसेवक त्यात उत्साहाने सहभागी झाले. त्यानंतर एका सजविलेल्या खुल्या जिपमधून नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची मिरवणूक काढण्यात आली. दुपारी ४ वाजेपर्यंत हा विजयी जल्लोष सुरु होता. राजकमल चौकातून सुरु झालेली ही विजयी रॅली राजापेठ व शहराच्या मध्यवर्ती ठिकाणाहून मिरविण्यात आली. महापालिकेत यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. याशिवाय महापालिका सभागृहाजवळ ‘मेटल डिटेक्टर’ ठेवण्यात आले होते. तेथे सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून तपासणी करण्यात आली. दरम्यान भाजपच्या महिला सदस्यांनी महापालिकेच्या आवारात फुगड्या खेळून विजयोत्सव साजरा केला.