आयुक्तांची कारवाई : शिक्षण विभागातील अधीक्षकांना नोटीस, कामचुकारपणा भोवलाअमरावती : महापालिका बांधकाम विभागाचे उपअभियंता प्रमोद इंगोले आणि शिक्षण विभागाचे अधीक्षक अजय बंसेले यांनी कामात कुचराई केल्याप्रकरणी आयुक्तांनी प्रशासकीय कारवाई केली आहे. यात इंगोले यांची दोन वेतनवाढ तर बंसेले यांना नोटीस बजावण्यात आली आहे. ही कारवाई आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी केली आहे.आयुक्त गुडेवार यांनी काढलेल्या आदेशानुसार उपअभियंता प्रमोद इंगोले यांना महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत दुसऱ्या हप्त्याची निधी प्राप्त होण्याच्या दुष्टीने सुरु असलेल्या कामांचे त्रयस्थ तांत्रिक परिक्षण शासकीय अभियांत्रिकी महाािवद्यालयाकडून करण्याचे वेळोवेळी निर्देश देण्यात आले. सदर कामाचा कालावधी आठ महिन्याचा व्यर्थ घालविल्याचा ठपका इंगोले यांच्यावर ठेवण्यात आला. त्यामुळे सदर योजनेतून दुसऱ्या हप्त्याची मागणी करता आली नाही. याबाबत प्रमोद इंगोले यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. मात्र इंगोले हे आयुक्तांना समाधानकारक उत्तर सादर करु शकले नाही. सोपविलेली जबाबदारी ते पूर्ण करु शकले नसल्यामुळे आयुक्तांनी दोन वार्षिक वेतन वाढ तात्पुरत्या स्वरुपात स्वरुपात दोन वर्षांसाठी पुढील वेतनवाढीवर परिणामकारक ठरणार नाही, अशा रितीने महाराष्ट्र महापालिका अधिनियम कलम ५६(२) (ब) व मनासे (शिस्त व अपिल) नियम १९७९ चे नियम ५(४) नुसार थांबविण्यात आली आहे. याबाबतची सेवापुस्तिकेत नोंद घेण्यात आली आहे. तसेच महापालिका शिक्षण विभागात अधीक्षकपदी कार्यरत अजय बंसेले यांनी शिक्षकांच्या वेतनाबाबत कार्यवाही करण्यात दिरंगाई केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. बंसेले यांना देखील वेतन वाढ का रोखण्यात येवू नये, अशी नोटीस बजावण्यात आली आहे. ही कारवाई आयुक्तांच्या आदेशानसुार सामान्य प्रशासन विभागाने केली आहे.
महापालिकेत उपअभियंत्यांची वेतनवाढ रोखली
By admin | Updated: February 11, 2016 00:30 IST