फ्रंटलाईन वर्कर नसल्याने लसीकरणात अनेक अडथळे
अमरावती : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली असली तरी अत्यावश्यक सेवा या सुरूच आहेत. शहरात घरगुती गॅस सिलिंडरची घरपोच डिलिव्हरी सुरू आहे. मात्र, गॅस सिलिंडर घरोघरी पोहोचविणाऱ्या डिलिव्हरी बॉयचे लसीकरण झाले आहे का, असा प्रश्न उपस्थित झाले आहे. असे असले तरी प्रत्यक्षात मात्र गॅस सिलिंडरची घरपोच डिलिव्हरी करणारे लसीकरणापासून वंचित असल्याचे दिसून येते. गॅस सिलिंडर वितरण करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा रोजच नागरिकांशी संपर्क येतो. मात्र, फ्रंटलाइन वर्कर नसल्याने त्यांच्या लसीकरणात अनेक अडथळे येत आहेत.
घरोघरी जाऊन गॅस सिलिंडरची डिलिव्हरी करणारा व्यक्ती कोरोनाच्या संसर्गाला कारणीभूत तर ठरत नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शहरात घरगुती गॅस सिलिंडरच्या विविध कंपन्या व त्या कंपन्यांच्या अनेक एजन्सी आहेत. या एजन्सीद्वारे शहरातील इमारतींमध्ये, कॉलनीत आणि झोपडपट्ट्यांमध्ये सिलिंडर पोहोचवले जातात. मात्र, अनेक ठिकाणांहून फिरून आलेल्या डिलिव्हरी बॉयमुळे कोरोना संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे या डिलिव्हरी करणाऱ्या व्यक्तींना लस द्यायला हवी, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
बाॅक्स
जबाबदारी कोणाची?
घरगुती गॅस घरोघरी पोहोचविणाऱ्या डिलिव्हरी बॉयच्या लसीकरणाची जबाबदारी एजन्सीने घेणे गरजेचे आहे. आपल्या कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर लस घेण्यासाठी प्रोत्साहित करायला हवे.
बॉक्स
सिलिंडर सॅनिटाईज केले का?
कोरोनापासून बचावासाठी सिलिंडर घरात घेतल्यानंतर त्याला सॅनिटाईज करणे गरजेचे असते. सिलिंडर जड असल्याने त्याला उचलताना हातांचा स्पर्श होतो. त्यामुळे त्या सिलिंडरमार्फत कोरोना पसरण्याचा धोका असतो. त्यामुळे सिलिंडरवर सॅनिटायझर फवारणी केली जावी. परंतु, सॅनिटायझर फवारताना घरात गॅस अथवा दिवा सुरू नसावा, याची काळजी घ्यायला हवी.
बॉक्स
१३२ डिलिव्हरी बॉय पॉझिटिव्ह
शहरात अनेक डिलिव्हरी बॉय कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. या काळात काही डिलिव्हरी बॉय आपल्या गावी निघून गेले, तर अनेक डिलिव्हरी बॉय नव्याने भरती झाले आहेत. त्यातील १३२ डिलिव्हरी बॉय पॉझिटिव्ह आल्याची माहिती आहे.
बॉक्स कोट
डिलिव्हरी बॉय म्हणतात...
सुरुवातीला ज्येष्ठ नागरिकांना लसीकरणाची परवानगी देण्यात आली होती. यानंतर १८ वयोगटावरील सर्वांना लसीकरणाची परवानगी देण्यात आली. या काळात लसीकरणात मोठ्या अडचणी निर्माण झाल्या. त्यात एक ते दोन दिवस ऑनलाईन बुकिंग करण्यासाठी असतो. त्यामुळे लस घेण्यात आली नाही. त्यामुळे येत्या एक ते दोन आठवड्यात लस घेईन.
- राजू माेहोड,
कोट
दोन महिने गावी असल्याने त्याठिकाणी लसीकरणाचा लाभ घेता आला नाही. अमरावतीत येऊन एक आठवडा झाला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात लस घेईन.
- संजय पवार,
----------------------
(ग्राफीक)
- शहरातील एकूण घरगुती गॅस ग्राहक : ४ लाख
- गॅस वितरण करणाऱ्या एजन्सी : २३
- घरपोच डिलिव्हरीसाठी असलेले कर्मचारी: ३ हजार
- किती कर्मचाऱ्यांनी घेतला पहिला डोस: १,२२५
- एकही डोस न घेणारे कर्मचारी : १,७७५