शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Crime: 'तो' व्हिडीओ अन् तीन कोटी, मुंबईत सीएने आयुष्यच संपवले, सुसाईड नोटमध्ये काय?
2
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानी युद्धनौका बंदरातच का नांगरलेल्या होत्या? मोठी माहिती समोर, लढायच्याच स्थितीत नाहीत
3
बॉयफ्रेंडसोबत फिरायला गेली, दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाला; पुढे जे झालं ते ऐकून उडेल अंगाचा थरकाप
4
डॅालर्स नाही लोकल करन्सी… रशियाच्या प्लाननं ट्रम्प यांचा तिळपापड, भारताला होणार का मोठा फायदा?
5
मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई
6
तुलसी Is Back! १७ वर्षांनी 'क्योंकी सास भी...'चा सीक्वल, स्मृती इराणीची पहिली झलक, 'या' दिवशी सुरू होणार
7
अमेरिकेवर संकट! उन्हाळी कँपिंगला गेलेल्या, २८ लहान मुली बुडाल्या; ४५ मिनिटांत २६ फूट पाणी वाढले...
8
"आता जगायचंच नाही! मी बायकोला त्रासलोय"; तरुणाची थेट राष्ट्रपतींकडे धाव! म्हणाला...
9
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
10
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
11
रशियाचा युक्रेनवर पुन्हा मोठा हल्ला, ११ ठार, ८० हून अधिक जखमी; रशियन मंत्र्याचाही मृत्यू
12
"महाराष्ट्राला आम्ही पोसतोय" म्हणणाऱ्या निशिकांत दुबेंना चिन्मयी सुमीतचं हिंदीतून सडेतोड उत्तर, म्हणाली- "त्या खासदाराला..."
13
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
14
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
15
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
16
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
17
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
18
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
19
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
20
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय

थकबाकीदार शेतकरी पुनर्गठनापासून वंचित

By admin | Updated: September 1, 2015 00:08 IST

नाबार्ड योजनेंतर्गत सन २००४ मध्ये सन १९९९ ते २००४ या पाच वर्षांच्या कालावधीत सतत दोन वर्षे दुष्काळ घोषित केलेल्या ...

शासनाने केला विश्वासघात : जिल्ह्यात सतत नापिकी, शेतकरी हैराणप्रभाकर भगोले चांदूररेल्वेनाबार्ड योजनेंतर्गत सन २००४ मध्ये सन १९९९ ते २००४ या पाच वर्षांच्या कालावधीत सतत दोन वर्षे दुष्काळ घोषित केलेल्या गावातील शेतकऱ्यांकडील संपूर्ण येणे कर्ज व त्या कर्जावरील संपूर्ण व्याज एकत्र करुन थकीत कर्जाचे समान पाच वर्षांच्या किस्त पाडून बँकांनी पुनर्गठन केले. या योजनेंतर्गत अमरावती जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील २३८ गावांतील पात्र सहकारी संस्थांचे ५४०६ शेतकऱ्यांकडील १०७६ लाख रुपयांच्या कर्जाचे पुनर्गठन केले होते. परंतु रिझर्व्ह बँक रेगुलेशन अ‍ॅट कायदा १९४९ कलम ३५(अ) नुसार २० नोव्हेंबरच्या आदेशान्यवये अमरावती जिल्ह्यातील सर्व ६६८ सहकारी संस्थेचे कर्जवाटप बंद केल्यामुळे शेतकऱ्यांना नवीन कर्जपुरवठा होऊ शकला नाही. त्यामुळे राज्य शासनाने २००५ मध्ये विदर्भातील आत्महत्याग्रस्त ६ जिल्ह्यांत विदर्भ पॅकेज जाहीर करुन त्याअंतर्गत सहकारी बँकेला १०७६ लाख कर्जमाफीची रक्कम प्राप्त झाल्यामुळे पुनर्गठन थकबाकीदार सभासदांना नवीन कर्जवाटप केले. अमरावती जिल्ह्यातील १९८१ गावातील पैसेवारी ५० पैशांच्या आत असल्याच्या कारणावरून दुष्काळ घोषित करुन विविध उपाययोजना जाहीर केल्या होत्या. विविध योजनेंतर्गत शासनाच्या धोरणानुसार दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जावरील व्याज वसुल करुन कर्जाचे तीन वर्षांच्या समान हप्त्यात रुपांतर करुन शेतकऱ्यांना केलेल्या कर्जवाटपामुळे शेतकऱ्यांच्या कर्जाचे ओझे वाढून त्या कर्जावर १२ टक्के प्रमाणे व्याज आकारणी करण्यात आल्यामुळे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना कर्ज भरणे शक्य न झाल्यामुळे शेतकरी आत्महत्या वाढत आहे.