शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षण द्यायचं, आंदोलन मोडायचं, की मला गोळ्या घालायच्या...; मनोज जरांगे-पाटील यांचा थेट इशारा
2
नागपूर हादरले! चाकू काढला आणि छातीवर सपासप वार; दहावीतील विद्यार्थिनीची शाळेसमोरच हत्या
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा पूर्ण होणार, प्रत्येक कोपऱ्यात मराठे दिसणार! मनोज जरांगे-पाटील काय म्हणाले?
4
Maratha Morcha Mumbai: मनोज जरांगेंना दिलासा, पण एका दिवसाचाच! पोलिसांचा निर्णय काय?
5
भारतावरील 'टॅरिफ' रशियन तेलामुळे नाही, तर ट्रम्प यांच्या नाराजीमुळे; अमेरिकन कंपनीचा दावा
6
'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं
7
मुंबईतील 'या' ठिकाणी लोक पैसे देऊन तासभर रडतात, प्रवेशासाठी होते गर्दी; काय आहे रुईकात्स?
8
Asia Cup 2025 : सिंग इज किंग! हरमनप्रीतची हॅटट्रिक; अखेरच्या टप्प्यात चीनचा करेक्ट कार्यक्रम
9
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावं, मनं जिंकण्याची हीच संधी : मनोज जरांगे-पाटील
10
"मला माझ्या नवऱ्यापासून वाचवा..."; महिलेने कारमधून मारली उडी, रस्त्यावरच घातला गोंधळ
11
"नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका
12
चांद्रयान-5, तंत्रज्ञान , हायस्पीड रेल्वे अन् 10 ट्रिलियनची गुंतवणूक...भारत-जपानमध्ये १३ करार
13
सरिता हिची आत्महत्या नव्हेतर हत्याच... पती पुरुषोत्तम खानचंदानी यांचा आरोप
14
पंतप्रधान मोदींना जपानमध्ये मिळाली 'दारुम डॉल'; काय आहे या बाहुलीचा भारताशी संबंध?
15
"१९९१ मध्ये फसवणूक करूनच..."; सिद्धरामय्यांच्या एका विधानानं काँग्रेसच्या 'मतचोरी' प्रकरणाची 'लंका' लावली; भाजपला मिळाला आयता मुद्दा!
16
राहुल गांधींना बदनाम करण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाईल; संजय राऊतांची टीका
17
मनोज जरांगे-पाटील यांना तात्काळ अटक करा; गुणरत्न सदावर्तेंची पोलीस महासंचालकांकडे मागणी
18
एअरपोर्टवर तरूणीच्या सामानाचं झालं 'चेकिंग'; पोलिसांनी बॅग उघडताच बसला धक्का.. आत काय निघालं?
19
बापरे! कच्च्या कांद्यामुळे आरोग्याचं मोठं नुकसान; समजल्यावर खाण्यापूर्वी कराल १०० वेळा विचार
20
'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा टीझर प्रदर्शित, वरुण धवन दिसला बाहुबली अवतारात

आगार गजबजले, बसगाडीत गुंजले 'ताजा खबर'चे स्वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 05:01 IST

लॉकडाऊनने लावलेले प्रतिबंध गुरुवारपासून दूर झाल्यामुळे आंतरजिल्हा आणि जिल्हांतर्गत बसफेºया सुरू झाल्यात. प्रवाशांमध्ये त्यमुळे आनंदाचे वातावरण आहे. गावी अडकून पडलेल्या नागरिकांची सोय झाली. चालक वाहकांमध्येही उत्साह आहे. एसटीला प्रवाशांनी प्रतिसाद दिला. फिजिकल डिस्टंसिंगबाबत आसनव्यवस्थेची काळजी एसटी प्रशासनाकडून घेण्यात आली.

ठळक मुद्देलालपरी धावली

सचिन मानकर ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : दीर्घ कालावधीनंतर आगार आणि बसस्थानके पुन्हा गजबजल्याचे सुखद चित्र गुरुवारी अनुभवता आले. बसगाड्यांचे आवागमन, प्रवाशांची गजबज आणि वृत्तपत्र विक्रेत्यांची लगबग हे पूर्वीचे चित्र जिवंत झाले.विघ्नहर्त्याच्या आगमनाची चाहूल लागली नि बसफेऱ्यांना प्रतिसाद देऊन कोरोनाच्या 'भयविघ्ना'वर जिल्हावासियांनी सशक्त मनाने जणू मातच केली.लॉकडाऊनने लावलेले प्रतिबंध गुरुवारपासून दूर झाल्यामुळे आंतरजिल्हा आणि जिल्हांतर्गत बसफेऱ्या सुरू झाल्यात. प्रवाशांमध्ये त्यमुळे आनंदाचे वातावरण आहे. गावी अडकून पडलेल्या नागरिकांची सोय झाली. चालक वाहकांमध्येही उत्साह आहे. एसटीला प्रवाशांनी प्रतिसाद दिला. फिजिकल डिस्टंसिंगबाबत आसनव्यवस्थेची काळजी एसटी प्रशासनाकडून घेण्यात आली. पहिल्याच दिवशी दोन लक्ष रुपयांच्या घरात उत्पन्न झाल्याची माहिती विभागीय नियंत्रक श्रीकांत गभणे यांनी दिली.बसमध्ये वृत्तपत्र; प्रवासी आनंदी‘आज की ताजा खबर’ हा परिचित स्वर एसटी बसमध्ये गुरुवारी पुन्हा एकदा गुंजल्याने प्रवाश्यांमधील वाचक सुखावला. अनेक दिवसांपासून प्रवाशांना बसमध्ये वृत्तपत्रे वाचण्याचा आनंद घेता आला नाही. बसगाड्यांमध्ये, बसस्थानकांवर हॉकर्सना वृत्तपत्रे विकताना बघून अनेकांनी ती खरेदी केलीत. पहिल्याच दिवशी वाचकांकडून मिळणाºया प्रतिसादामुळे वृत्तपत्र विक्रेत्यांच्या चेहऱ्यावरही आनंद झळकला.गुरुवारी एसटी बसमध्ये वृत्तपत्र विक्रीला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. बसमध्ये प्रवासीही भरपूर होते. प्रवाशांनी वृत्तपत्र विकत घेतल्याने मला आनंद झाला. वृत्तपत्र मिळल्याने प्रवाशीही आनंदी होते.- मनोज सोलंकी,वृत्तपत्र विक्रेता, दर्यापूरपाच महिन्यांच्या दीर्घ कालावधीनंतर एसटीने मूर्तिजापूरला प्रवास केला. सार्वजनिक वाहतूक बंद असल्याने दोन शहरांमधील व्यवहारही खोळंबले होते. एसटी वाहतूक सुरू झाल्याचा मनस्वी आनंद आहे.- अक्षय टेहरे,एसटी प्रवासीप्रवाशांसाठी गुरुवारचा दिवस आनंदाचा ठरला. यापूर्वी १५ दिवसांतून एकच दिवस आम्हाला बस सेवा देता येत होती. आता ते बंधन दूर झाले. बसमध्ये प्रवासी पाहून आम्हाला आनंद झाला.- नंदकिशोर मुकिंद,बसचालकबसमध्ये प्रवाशांकडून आज चांगला प्रतिसाद मिळाल्याने आम्हाला दिलासा मिळाला. चार महिन्यांत १५ दिवसांतून एकदाच कामावर यावे लागत होते. आता बससेवा सुरळीत झाल्याने आम्ही आनंदी आहोत.- नरेंद्रसगणे,बसवाहक

टॅग्स :state transportएसटी