शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

डेंग्यू : रवि राणा उतरले रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 01:04 IST

शहरात सर्वदूर झालेली डेंग्यूची लागण लक्षात घेता आ. रवि राणा शनिवारी कार्यकर्त्यांसह रस्त्यावर उतरले. गरीब जनतेला उपचारासाठी येत असलेला महागडा खर्च पाहता त्यांनी महापालिका यंत्रणेला कामी लावले. यावेळी आ. राणा यांनी काही भागात स्वत: फवारणीसुद्धा केली.

ठळक मुद्दे६० जणांचे पथक : कचऱ्याच्या ढिगाऱ्यात मनपा अधिकाऱ्यांना उतरविले

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरात सर्वदूर झालेली डेंग्यूची लागण लक्षात घेता आ. रवि राणा शनिवारी कार्यकर्त्यांसह रस्त्यावर उतरले. गरीब जनतेला उपचारासाठी येत असलेला महागडा खर्च पाहता त्यांनी महापालिका यंत्रणेला कामी लावले. यावेळी आ. राणा यांनी काही भागात स्वत: फवारणीसुद्धा केली. त्यांच्यासमवेत प्रबुद्ध मंडळ, भीमज्योत संघटना, साई मित्र मंडळ साईनगर, संघर्ष युवा मंडळ म्हाडा व युवा स्वाभिमान पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले. या परिसरात ६० कामगारांचे एक पथक कामी लावले. त्यांच्याकडे १७ फॉगिंग मशिन देण्यात आल्या.फ्रेजरपुरा, महादेवखोरी, संजय गांधीनगर, वडरपुरा, जेवडनगर, चवरेनगर, साईनगर, बडनेरा जुनीवस्ती व नवीवस्ती परिसरातील गल्ली-बोळात फिरून आ. राणा यांनी प्रत्यक्ष फवारणी करवून घेतली. या परिसरातील नाल्यांत साचलेला गाळ, कचऱ्याचे ढिगारे व अन्य अव्यवस्था पाहता मनपा अधिकाऱ्यांना नालीत उतरवून वस्तुस्थितीची जाणीव करून दिली व स्वच्छतेबाबत सातत्य ठेवण्याचे निर्देश दिले. डेंग्यूच्या उपचाराकरिता ५० रुपये खर्च येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याच्या पार्श्वभूमिवर आ. राणा यांनी तत्क्षण दखल घेत वस्तुस्थिती यंत्रणेच्या लक्षात आणून दिली. यावेळी महापालिकेच्या आरोग्य अधिकारी सीमा नैताम, स्वास्थ्य अधीक्षक अरुण तिजारे, युवा स्वाभिमानचे शहर अध्यक्ष संजय हिंगासपुरे, सचिन भेंडे, नितीन बोरेकर, नीलेश भेंडे, संजीव गायकवाड, अर्शद अली, सुजित तायडे, नितीन तायडे, राजेश सुंडे, सविता लोखंडे आदी कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :Ravi Ranaरवी राणाdengueडेंग्यू