शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

डेंग्यूचा संसर्ग तीव्र, १६ दिवसांत १९ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 23:42 IST

१९ सप्टेंबर ते ४ आॅक्टोबर या कालावधीत तापाने आजारी असलेल्या ६० रुग्णांचे रक्तजल नमुने घेण्यात आले होते.

ठळक मुद्दे२५ दिवसांत ६० रुग्णांचे रक्तजल नमुने : खासगी रुग्णालयात डेंग्यूबाधित रुग्णांची गर्दी, दिवाळीच्या तोंडावर लागण

अमारवती : १९ सप्टेंबर ते ४ आॅक्टोबर या कालावधीत तापाने आजारी असलेल्या ६० रुग्णांचे रक्तजल नमुने घेण्यात आले होते. यापैकी १९ रक्तजल नमुने डेंग्यूदूषित अर्थात पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. केवळ १६ दिवसांत १९ रुग्णांना अर्थात प्रत्येक दिवशी दाखल झालेल्या कमाल चार रुग्णांपैकी एकाला डेंग्यूची बाधा झाल्याचे अधिकृतरीत्या उघड झाले आहे. शहरातील एकाएका खासगी दवाखान्यामध्ये डेंग्यूचे सरासरी ७ ते १० रुग्ण दाखल असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. यावरून डेंग्यूची साथ तीव्र होत असल्याचेही स्पष्ट झालेविशेष म्हणजे, जानेवारी ते १९ सप्टेंबरपर्यंत केवळ सात रुग्णांना डेंग्यूची बाधा झाल्याचा दावा महापालिका यंत्रणेने केला होता. यवतमाळ येथील सेंटिनल सेंटरमधून प्राप्त झालेल्या रक्तजल नमुन्यांचा हवाला त्यासाठी देण्यात आला. जिल्ह्यात डेंग्यूने कुणाचाही मृत्यू झाला नाही. डेंग्यू आटोक्यात असल्याचा दावा या आकडेवारीवरून करण्यात आला होता; मात्र त्यानंतर ४ आॅक्टोबरपर्य$ंत पाठविलेल्या रक्तजल नमुन्यांचा अहवाल आल्यानंतर हा आकडा ७ वरून २६ वर पोहोचला आहे. ५ ते १६ आॅक्टोबरदरम्यान पाठविलेल्या ४२ रक्तजल नमुन्यांचा अहवाल अद्याप अप्राप्त आहे. पाठविलेल्या रक्तजल नमुन्यांच्या तुलनेत सरासरी २६ टक्के रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचे स्पष्ट आहे. त्यामुळे ज्या ४२ रक्तजल नमुन्यांचा अहवाल येणे बाकी आहे. त्यातील १० रुग्ण डेंग्यूबाधित येण्याची शक्यता नाकारता येत नाही. १ ते १६ आॅक्टोबर या कालावधीत शहरातील विविध खाजगी रुग्णालायात दाखल असलेल्या ६० रुग्णांचे रक्तजल नमुने तपासणीसाठी यवतमाळला पाठविण्यात आले आहे.या परिसरातील रुग्णांना बाधा१९ सप्टेंबर ते ४ आॅक्टोबर या कालावधीत खासगी रुग्णालयात दाखल असलेल्या ज्या १९ रुग्णांचे रक्तजल नमुने डेंग्यूदूषित आढळून आलेत, ते रुग्ण नारायणनगर, जयंत कॉलनी, कल्याणनगर, वडाळी, मोतीनगर, श्यामनगर, प्रशांतनगर, गाडगेनगर, दानिश कॉलनी, श्यामनगर, किशोरनगर, किरणनगर, एलआयसी कॉलनी, विमलनगर, जलारामनगर, अंबाविहार, फ्रेजरपुरा व गोपालनगरातील रहिवासी आहेत.'त्या' नऊपैकी दोन पॉझिटिव्हराजापेठ स्थित डॉ. मनोज निचत यांच्या रुग्णालयात ४ आॅक्टोबरपर्यंत नऊ रुग्णांची डेंग्यूच्या निदानासाठी करण्यात आलेली ‘एनएस १ अ‍ॅन्टीजेन’ ही चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यापैकी चार रुग्ण ग्रामीण भागातील, तर पाच रुग्ण महापालिका क्षेत्रातील होते. त्यापैकी जलारामनगर येथील २९ वर्षीय महिला व गोपालनगर येथील ३५ वर्षीय महिला डेंग्यूबाधित आढळून आल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.