शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

डेंग्यूची मगरमिठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 22:55 IST

दोन महिन्यांपूर्वी शहरात तुरळक आढळणाऱ्या डेंग्यूची आता अमरावती शहराला मगरमिठी पडली आहे. हजारांवर नागरिकांना डेंग्यूची बाधा झाली असल्याचा अंदाज वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केला असताना, महापालिका मात्र यासंबंधाने लपवाछपवीचा खेळ खेळत आहे. 'लोकमत'नेच डेंग्यूचा शिरकाव झाल्याची माहिती सर्वप्रथम उघड केली.

संदीप मानकर ।अमरावती : दोन महिन्यांपूर्वी शहरात तुरळक आढळणाऱ्या डेंग्यूची आता अमरावती शहराला मगरमिठी पडली आहे. हजारांवर नागरिकांना डेंग्यूची बाधा झाली असल्याचा अंदाज वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केला असताना, महापालिका मात्र यासंबंधाने लपवाछपवीचा खेळ खेळत आहे. 'लोकमत'नेच डेंग्यूचा शिरकाव झाल्याची माहिती सर्वप्रथम उघड केली. आमदार राणा यांनी या मुद्द्याची तातडीने दखल घेऊन डॉ. निचत यांच्या रुग्णालयाला भेट दिली. महापालिका आयुक्तांची कानउघाडणी केली. आयुक्तांनी यानंतरही प्रभावी उपाययोजना न केल्यामुळे पूर्वी दक्षिणपूर्व अमरावतीत आढळलेला हा आजार शहरात सर्वत्र थैमान घालतो आहे. महापालिका आयुक्त मात्र उपाययोजना सुरू आहेत, याशिवाय दुसरे काही बोलत नाहीत.हा तर रुग्णांच्या जीवाशी खेळ!डेंग्यूची बाधा झाल्याचे निश्चित निदान करण्यासाठी एनएस-वन आणि आयजीएम या रक्तचाचण्या करण्यात येतात. डेंग्यूची लागण होण्याच्या सात दिवसांपर्यंत चाचणी करावयाची असल्यास एनएस-वन ही चाचणी करावयास हवी. सात दिवस उलटून गेले असतील, तर आयजीएम चाचणी करावयास हवी. सात दिवसांच्या आत आयजीएम चाचणी केल्यास रिपोर्ट 'निगेटिव्ह' येतो. त्यामुळे डेंग्यूरुग्णास डेंग्यू नसल्याचे निदान होते. परिणामी ते त्याच्या जिवावर बेतू शकते. महापालिकेच्या बंधनानुसार रक्तनमुने यवतमाळच्या शासकीय प्रयोगशाळेतच पाठवायचे असतात. परंतु, तेथे एनएस-वन कीट उपलब्ध नसल्यामुळे सात दिवसांच्या आतील रुग्णांची आयजीएम रक्तचाचणी केली जाते. ती निगेटिव्ह येते.आमदार राणांच्या बंधूलाही डेंग्यूडेंग्युच्या मुद्द्यावरून महापालिका आयुक्त संजय निपाणे यांची खरडपट्टी काढणारे आणि खासगी इस्पितळात भेट देऊन डेंग्यूसंबंधी महापालिकेची लपवाछपवी उघड करणारे बडनेऱ्याचे आमदार रवि राणा यांच्या बंधूंना डेंग्यूने कह्यात घेतले. आमदार आणि हे बंधू एकाच घरात वास्तव्यास आहेत. सामान्यांची स्थिती काय असेल, याची कल्पनाच केलेली बरी.सर्वच रुग्णालयांत पन्नासावर रुग्णडॉ. विजय बख्तार आणि डॉ. सचिन काळे यांच्या रुग्णालयात प्रत्येकी ६० रुग्ण पॉझिटिव्ह निघाले. डॉ. निचत यांच्या श्रीकृष्ण हॉस्पिटलमध्ये तर डबल सेंच्युरी पूर्ण झाली. डॉ. बोंडे हायटेक सुपरस्पेशालिटी १००, पीडीएमसी ६१, गेट लाइफ हॉस्पिटल १७ हे आकडे काही महत्त्वाच्या रुग्णालयांचे असले तरी सर्व लहान-मोठे जनरल फिजिशियन आणि हॉस्पिटलकडील डेंग्यूरुग्णांची एकंदर आकडेवारी ही डोळे विस्फारणारी आहे.पोलीस क्राइम ब्रँचच्या प्रमुखाला डंखअट्टल गुन्हेगारांना घाम फोडणाऱ्या क्राइम ब्रँचचे प्रमुख असलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमेश आत्राम यांनाही डेंग्यूच्या डासाने डंख करून रुग्णालयात दाखल होण्यास बाध्य केले. रविनगर परिसरात राहत असून, यापूर्वीही येथे डेंग्यूरुग्ण आढळले आहे.