शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
2
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
3
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
4
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
5
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
6
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
7
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
8
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
9
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
10
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
11
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
12
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
13
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
14
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
15
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
16
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
17
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
18
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
19
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
20
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती

गणपती विसर्जन मिरवणुकीत तलवार, त्रिशूलचे प्रदर्शन भोवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 22:21 IST

नांदगावपेठ ठाण्याच्या हद्दीत निघालेल्या गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीत सहभागी कार्यकर्त्यांनी हाती तलवारी व त्रिशूल घेऊन प्रदर्शन केल्याने सोमवारी रात्री प्रचंड खळबळ उडाली. मंडळ कार्यकर्त्यांचा हा प्रताप चर्चेचा विषय बनला होता.

ठळक मुद्दे१७ अटकेत : नांदगावपेठेत तणावपूर्ण शांतता, शस्त्रे जप्त

अमरावती : नांदगावपेठ ठाण्याच्या हद्दीत निघालेल्या गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीत सहभागी कार्यकर्त्यांनी हाती तलवारी व त्रिशूल घेऊन प्रदर्शन केल्याने सोमवारी रात्री प्रचंड खळबळ उडाली. मंडळ कार्यकर्त्यांचा हा प्रताप चर्चेचा विषय बनला होता.नांदगावपेठ पोलिसांनी या प्रकरणात १७ जणांना अटक केली, त्यांच्याजवळील दोन तलवारी, चार हत्यार जप्त केली. तलवारबाजीनंतर पोलिसांनी आरोपींची धरपकड सुरू केल्यामुळे गावात तणाव निर्माण झाला होता. नांदगावपेठ येथे बजरंग दलाचे विदर्भ संयोजक संतोष गहरवाल यांच्या नेत्तृत्वात बाल दीपक गणेश मंडळाची मिरवणूक सोमवारी सायंकाळी ७ वाजता निघाली.दीडशे जणांविरुद्ध गुन्हेग्रामपंचायत चौकात गणेश मंडळाने महाआरतीनंतर बन्नेखा चौकापर्यंत मंडळातील पदाधिकाऱ्यांनी तलवारींचे प्रदर्शन सुरू केले. ते नाईकवाडी मशिदीपर्यंत अव्याहत सुरू होते. मिरवणूक मध्यरात्री विसर्जनस्थळी पोहोचली. दरम्यान, तलवारीसोबत भाले उंचावले गेले आणि चिथावणीखोर गाणी वाजविल्याने विशेष समुदायात रोष व्यक्त झाला. यावेळी मोठा समुदाय गोळा झाला होता. परंतु, पोलिसांनी तणावाची स्थिती हाताळून शांत केली. तथापि, जोपर्यंत संतोष गहरवाल आणि त्याच्या कार्यकर्त्यांना अटक होत नाही, तोपर्यंत परिसरात बसण्याचा आग्रह विशेष समुदायाने केला. अखेर नांदगावपेठ पोलिसांनी सुमारे दीडशे कार्यकर्त्यांविरुद्ध भादंविच्या कलम १५३ (३), ४/२५ आर्म अ‍ॅक्ट तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३४, १३५, पर्यावरण संरक्षण कायदा कलम १५, १९ व ध्वनिप्रदूषण प्रतिबंध कायदा कलम १५ अन्वये गुन्हा दाखल केला. पोलिसांनी मध्यरात्रीच आरोपींची धरपकड सुरू केली. यामध्ये संतोष गहरवाल, सचिन नरसिंगकार, नितीन नरसिंगकार, अंकुश चौधरी, वैभव कोळसकर, अंकुश बाणासुरे, रूपेश पोटफोडे, प्रवीण शेंदरकर, प्रफुल्ल बाणासुरे, राहुल मारबते, सुमित काकाणी, नरेंद्र गवई, सूरज राठोर, महेंद्र कोठार, गजानन इंगळे, जगदीश बंड, ऋषीकेश तायडे यांना अटक केली. याशिवाय आणखी काही कार्यकर्ते पसार आहेत. निरंजन दुबे, राहुल पंचबुद्धे, मारोती ससाने, जगदीश बंड, दिलीप नागापुरे, रोशन बोकडे, दीपक नागापुरे, मंगल भगत, नंदू बैराळे आदी आरोपींचा शोध नांदगावपेठ पोलीस घेत आहेत.पोलीस आयुक्तांनी काढली रात्र जागूननांदगावपेठ हद्दीतील तणावाची स्थिती पाहता, दोन पोलीस उपायुक्त, दंगा नियंत्रण पथक, राज्य राखीव पोलीस दल व स्थानिक पोलिसांचा बंदोबस्त होता. दीडशे जणांचा ताफा स्थितीवर लक्ष ठेवून आहे. आरोपींची धरपकड सुरू असताना नागरिकांनी विरोध केल्यामुळे तणाव निर्माण झाला. अखेर १७ आरोपींना पोलिसांनी अटक केली. सर्व आरोपींना सीपी संजयकुमार बाविस्कर यांच्यासमक्ष हजर केले. सीपी हे मंगळवारी पहाटे ५ वाजेपर्यंत पोलीस आयुक्तालयातच उपस्थित होते, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.