शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

‘वेस्ट’ संत्र्याला हैद्राबादेत मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2019 01:15 IST

तालुक्यातील वणी बेलखेडा येथील सलीम खान करीम खान या शेतकऱ्याने झाडावरून गळून पडलेल्या बोराच्या आकाराची संत्री खरेदी-विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. हैद्राबादला त्या संत्र्यापासून नामांकित कंपनीकडून रक्तदाबाची औषधी तयार होते.

ठळक मुद्देकल्पक स्वयंरोजगार । मजुरांच्या हाताला मिळाले काम

सुमीत हरकूट।लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर बाजार : तालुक्यातील वणी बेलखेडा येथील सलीम खान करीम खान या शेतकऱ्याने झाडावरून गळून पडलेल्या बोराच्या आकाराची संत्री खरेदी-विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. हैद्राबादला त्या संत्र्यापासून नामांकित कंपनीकडून रक्तदाबाची औषधी तयार होते. ‘वेस्ट’पासून ‘बेस्ट’ बनविणाºया या व्यवसायातून सलीम खान यांनी इतरांनाही रोजगार दिला.काही वर्षांपासून सातत्याची नापिकी व शेतमालाचे पडलेले भाव यामुळे भरडून गेलेला शेतकरी अस्मानी व सुलतानी संकटांचा सामना करावा लागत आहे. तथापि, वणी बेलखेडा या लहानशा गावातील सलीम खान या तरुणाची पूरक व्यवसायाची धडपड सुरू होती. झाडाखाली गळून पडलेली लहान आकाराची संत्रा फेकली जातात, हे त्यांच्या लक्षात आले. शेतकऱ्यांसाठी निरुपयोगी संत्री कुणाच्या उपयोगाची असेल, याबाबत शोध घेतला. यादरम्यान हैद्राबाद येथील औषध कंपनीशी संपर्क केला. येथे रक्तदाब व रक्तस्राव थांबविण्यासाठी औषध तयार केले जात असल्याचे समजले. तेव्हापासून झाडाखाली गळून पडलेली संत्री गोळा करून ते विकतात.एक मजूर दिवसभरात नऊ ते दहा किलो लहान संत्री सहजरीत्या गोळा करतो. काही मजूर रोजगार मिळत नसल्यास ही बोराएवढी संत्री गोळा करण्याकरिता बागेत जातात. परिसरात मोठ्या प्रमाणात संत्राबागा असल्याने सलीम खान यांच्याकडे दररोज दोन ते तीन क्विंटल आवक होत आहे.एक किलो संत्र्याला ४५ रूपयेसंत्राबागेत निंदण करतानाच शेतमजूर झाडावरून गळून पडलेल्या बोराच्या आकाराची संत्री गोळा करू लागले. पूर्णत: सुकलेली संत्री ४० ते ४५ रुपये प्रतिकिलो, तर ओली संत्री २५ रुपये किलो दराने सलीम खान खरेदी करीत आहेत. मजुराला १२५ ते १५० रुपये अतिरिक्त रोजगार मिळत आहे. आंबिया बहराच्या वेळी सलीम यांचा व्यवसाय अधिक बहरतो.