शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
3
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
4
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
5
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
6
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
7
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
8
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
9
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
10
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
11
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
12
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
13
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
14
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
15
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
16
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
17
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
18
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
19
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
20
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…

तीन लाख हेक्टर उद्‌ध्वस्त २१४.३६ कोटींची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2020 05:00 IST

यंदाच्या खरीप हंगामात जून महिन्यात पावसाने हजेरी लावली व उसंत घेतली. त्यानंतर जुलै महिन्यापासून रिपरीप सुरु झाली. ती अजूनही सुरू आहे. या कालावधीत मूग, उडदासह सोयाबीनचे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. कपाशीची मोठ्या प्रमाणात बोंडगळ झाली. विशेष म्हणजे गुलाबी बोंडअळीचा प्रकोप यंदाही कायम आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे यंदा खरिपातील अर्धेअधिक पिकांचे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देजिल्हा प्रशासनाचा शासनाला अहवाल । मूग, उडीद, सोयाबीनसह संत्रा बागांचेही नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पेरणीनंतर सतत पाऊस व ढगाळ वातावरणामुळे कीड,रोगांचा प्रादुर्भाव होवून जून ते सप्टेंबर या कालावधीत २ लाख ९१ हजार ५८४ हेक्टर क्षेत्रामधील खरिपाची पिके व फळपिकांचे ३३ टक्कयांवर नुकसान झालेले आहे. या बाधित क्षेत्राला ह्यएनडीआरएफह्णच्या निकषाप्रमाणे मदत मिळावी यासाठी जिल्हाधिकारी यांनी २१४ कोटी ३६ लाख ९२ हजार २५० रुपयांच्या मागणीचा अहवाल शासनाला पाठविला आहे.यंदाच्या खरीप हंगामात जून महिन्यात पावसाने हजेरी लावली व उसंत घेतली. त्यानंतर जुलै महिन्यापासून रिपरीप सुरु झाली. ती अजूनही सुरू आहे. या कालावधीत मूग, उडदासह सोयाबीनचे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. कपाशीची मोठ्या प्रमाणात बोंडगळ झाली. विशेष म्हणजे गुलाबी बोंडअळीचा प्रकोप यंदाही कायम आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे यंदा खरिपातील अर्धेअधिक पिकांचे नुकसान झाले आहे. यासंदर्भात सातत्याने तक्रार झाल्याने जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी संयुक्त सर्वेक्षणासह पंचनाम्याचे आदेश यंत्रणेला दिले. याबाबतचा अहवाल चार दिवसांपूर्वी राज्य शासनाला सादर करण्यात आलेला आहे. ऑक्टोबर महिन्यातील नुकसानीच्या सर्व्हेक्षणाचे आदेशदेखील तीन दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.जिल्ह्यात यंदा १० तालुक्यांनी पावसाची सरासरी पार केलेली आहे. सर्वाधिक पाऊस ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात झालेला आहे. पिकांच्या वाढीच्या व फुलोराच्या कालावधीत नैसर्गिक आपत्तीने बळीराजाच्या तोंडचा घास हिरावला. त्यापूर्वी उगवणशक्ती नसलेले सोयाबीन कंपन्यांद्वारा शेतकऱ्यांच्या माथी मारल्याने २५ हजारांवर हेक्टर क्षेत्रात दुबार पेरणीची वेळ ओढावली होती. त्यामुळे शासन मदतीसह पिकांना विमा भरपाई मिळावी, अशी शेतकऱ्यांनी मागणी आहे.३०२०६० शेतकऱ्यांच्या जिरायत क्षेत्राखालील २७७१७०.३५ हेक्टर क्षेत्रामधील पिकांसाठी १८८,४७,५८,३८० रुपयांची मागणी करण्यात आलेली आहे.३२३ शेतकऱ्यांच्या ११७.६३ हेक्टरमधील बागायत पिकांचे १५,८७,८७० रुपयांचे नुकसान झालेले आहे.२०२१३ शेतकऱ्यांच्या १४२९७ हेक्टरमधील फळपिकांचे २५,७३,४६,००० रुपयांचे नुकसान झालेले आहे३२२५९६ शेतकऱ्यांच्या २९१५८४.९७ हेक्टरमधीळ पिकांचे २१४,३६,९२,२५० रुपयांचे नुकसान झालेले आहे.इतर पिकांचेही नुकसानयंदाच्या खरीप हंगामात ज्वारी २६२६ हेक्टर, तूर १५७९ हेक्टर, मका १८०८ हेक्टर, धान ३८१८ हेक्टर या पिकांसाठी ६८०० रुपये हेक्टर, यासोबतच केळीचे ११३ हेक्टर, भाजीपाला १.४५ हेक्टर, ऊस २.५५ हेक्टरल १३,५०० रुपये हेक्टर व संत्रा १४,०९७ हेक्टर, मोसंबी १९९ हेक्टरला १८,००० रुपये हेक्टरप्रमाणे अपेक्षित निधीची मागणी शासनाकडे केलेली आहे.

टॅग्स :agricultureशेती