अंजनगाव सुर्जी : रोजगार हमी योजनेंतर्गत सिंचन विहिरीचे चार महिन्यांपूर्वीच बांधकाम पूर्ण झाले, तरीसुद्धा तहसील अंतर्गत रोजगार हमी योजनेचा कनिष्ठ लिपीक यांनी सदर सिंचन विहीर बांधकामाची रक्कम काढण्यासाठी १० हजार रुपयांची मागणी केली व मी गुरुवारी यांना हजार रुपये दिले, अशी तक्रार आ. बुंदिले यांच्याकडे प्रशांत सरदार यांनी केली. मग्रारोहयो अंतर्गत घरकुलाचे पैसे हे अधिकारी काढत नसल्याची तक्रार प्रकाश तायडे यांनी केली. त्यावर आमदार रमेश बुंदिले उलट अधिकाऱ्याचीच बाजू मांडत असल्यामुळे आलेल्या लाभार्थी व नागरिकांचा पारा चढला. शेवटी तुम्हाला अधिकारी घाबरत नाही, काय कामाचे आमदार अशा भाषेत आमदारांची कानउघाडणी केली. वाद विकोपाला जाताच पंचायत समिती सभापती विनोद टेकाडे, उपसभापती नितीन पटेल, राजेंद्र भांबूरकर यांनी तक्रारदार नागरिकांची बाजू ऐकून घेतली व त्या रोजगार हमी योजना सिंचन विहिरीच्या अधिकाऱ्याला बोलावून त्याची खरडपट्टी काढली. तक्रारदाराची मनधरणी करून त्याला शांत केले. तक्रारकर्त्याचा सिंचन विहिरीचा हप्ता व घरकुलाचे काम तत्काळ करण्याचे त्या अधिकाऱ्याला सांगितले. त्यामुळे अंजनगाव तहसीलमध्ये याबाबत चांगलीच चर्चा रंगली होती. (प्रतिनिधी)
कनिष्ठ लिपिकाकडून लाचेची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2016 00:00 IST