शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात ग्रामीण भागातील श्वानांचेही होणार निर्बिजीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2018 20:13 IST

शहरी भागासह ग्रामीण भागातही मोकाट श्वानांचा वावर वाढला आहे. या श्वानांमळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. त्या पार्श्वभूमिवर कुत्र्यांची वाढती संख्या मर्यादित ठेवण्यासाठी आणि ‘मनुष्य-श्वान’ संघर्ष टाळण्यासाठी जिल्हा परिषद स्तरावर देखरेख समिती गठित करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देमोकाट श्वानांचा हैदोस जिल्हा परिषद स्तरावर देखरेख समिती

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरी भागासह ग्रामीण भागातही मोकाट श्वानांचा वावर वाढला आहे. या श्वानांमळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. त्या पार्श्वभूमिवर कुत्र्यांची वाढती संख्या मर्यादित ठेवण्यासाठी आणि ‘मनुष्य-श्वान’ संघर्ष टाळण्यासाठी जिल्हा परिषद स्तरावर देखरेख समिती गठित करण्यात येणार आहे. ग्रामविकास विभागाने राज्यातील सर्व जिल्हा परिषद यंत्रणेला तसे आदेश दिले असून रेबिज निर्मूलन व श्वान निर्बीजीकरण कार्यक्रम आखला जाणार आहे. महापालिका क्षेत्राप्रमाणे आता ग्रामीण भागातील मोकाट श्वानांवर निर्बिजीकरण शस्त्रक्रिया केली जाईल.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार नगरविकास विभागाने यापूर्वीच नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांची देखरेख समिती स्थापन केली. त्या अनुषंगाने प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्था अर्थात जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतींनी ‘अ‍ॅनिमल बर्थ कंट्रोल मॉनिटरिंग कमेटी’ स्थापन करण्याचे निर्देश ग्रामविकास विभागाने दिले आहेत. आयुक्त वा त्या स्थानिक प्राधिकरणाचा प्रमुख या समितीचा कार्यकारी अध्यक्ष राहील. याशिवाय स्थानिक आरोग्य व्यवस्थेचा एक प्रतिनिधी पशुवैद्यकीय अधिकारी, याशिवाय अ‍ॅनिमल वेल्फेअर आॅर्गनायझेशनचे दोन प्रतिनिधी यात राहतील.जिल्हा परिषदेंतर्गत स्थापन झालेल्या या समितीला झालेल्या कार्यवाहीबाबतचा मासिक अहवाल शासनास सादर करावा लागेल. यासाठी जि.प. स्तरावर जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी व विभागीय आयुक्त स्तरावर उपायुक्त (विकास) यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी हे त्यांचा अहवाल प्रत्येक महिन्याच्या ५ तारखेपर्यंत उपायुक्तांकडे (विकास) सादर करतील.समितीची कार्यकक्षाश्वान उत्पत्ती नियंत्रण कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी समितीस करावी लागेल. श्वान पकडणे, त्यांचे लसीकरण, निवारा, औषधोपचार, निर्बिजीकरण, वाहतूक हे सुद्धा समितीचेच कार्य असेल. भटक्या श्वानांची संख्या निश्चित करण्यासाठी सर्वेक्षण, त्यासाठी एजंसीची नेमणूक, जनजागृती करणे, पाळीव श्वान मालकांना वेळोवेळी सूचना देणे.

टॅग्स :dogकुत्रा