चौकशीचे निर्देश : स्थायी समितीत गाजला मुद्दाअमरावती : जिल्हा परिषद बांधकाम विभागामार्फत जिल्ह्यातील उपविभागांमध्ये करण्यात आलेली बांधकामाच्या निकृष्ट दर्जावर उपअभियंत्यासह अधिनस्थ ृअधिकाऱ्यांनी शिक्कामोर्तब केल्यानंतर अवघ्या तीन महिन्यांत तेच काम दर्जेदार असल्याचा जावईशोध बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी लावला. शुक्रवारी आयोजित स्थायी समितीच्या सभेत हा प्रकार उघडकीस आला.काँग्रेसचे गटनेता बबलू देशमुख यांनी हा मुद्दा मांडताच अधिकाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकली. या प्र्रकाराची सविस्तर चौकशी करण्याचे आदेश स्थायी सभापती तथा जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश उईके यांनी बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता पी.जी.भागवत यांना दिल्याने खळबळ उडाली आहे.सीईओंना सुनावले स्थायी समितीची सभा शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या सभागृहात विविध विषयांना अनुसरून दुपारी १ वाजता बोलविण्यात आली होती. या सभेला जि.प. पदाधिकारी व सदस्य तसेच खातेप्रमुख उपस्थित होते. मात्र, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी सभेला वेळेवर उपस्थित न झाल्याने त्यांना काँग्रेसचे गटनेता बबलू देशमुख यांनी वेळेचे पालन करण्याबाबत खडेबोल सुनावले.
निकृष्ट बांधकामाला गुणवत्तेचे प्रमाणपत्र
By admin | Updated: June 13, 2015 00:14 IST