शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

मृग बहराचे ‘डिस्टन्सिंग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 05:00 IST

संत्राउत्पादक जिल्ह्याच्या १४ तालुक्यांतील एकूण ५५ हजार हेक्टर क्षेत्रापैकी सर्वाधिक २० हजार हेक्टर क्षेत्र वरूड तालुक्यात आहे. यापैकी बहुतांश क्षेत्रात मृग बहराचे उत्पादन घेतले जाते. चार वर्षांपासून अपेक्षित उत्पन्नाला मुकलेल्या आणि दुष्काळाने होरपळलेल्या संत्राउत्पादक शेतकऱ्यांना निदान यावर्षी तरी सुगीची अपेक्षा होती.

ठळक मुद्देअत्यल्प उत्पादन : सतत पाचव्या वर्षी उत्पादन माघारले, भाव जबरदस्त

देवेंद्र धोटे।लोकमत न्यूज नेटवर्कबेनोडा शहीद : मे महिन्यात बरसलेल्या अवकाळी पावसामुळे संत्राबागांचा ताण तुटल्याने आणि वरून पूर्वमोसमी पाऊस आल्याने आस लावून बसलेल्या संत्राउत्पादक शेतकऱ्यांचा यावर्षी भ्रमनिरास झाला. मृग बहरानेही कोरोनाकाळात ‘डिस्टन्सिंग’ पाळत हुलकावणी दिल्याने जवळपास ९० ते ९५ टक्के क्षेत्रातील संत्राबागा बहराविना आहेत.संत्राउत्पादक जिल्ह्याच्या १४ तालुक्यांतील एकूण ५५ हजार हेक्टर क्षेत्रापैकी सर्वाधिक २० हजार हेक्टर क्षेत्र वरूड तालुक्यात आहे. यापैकी बहुतांश क्षेत्रात मृग बहराचे उत्पादन घेतले जाते. चार वर्षांपासून अपेक्षित उत्पन्नाला मुकलेल्या आणि दुष्काळाने होरपळलेल्या संत्राउत्पादक शेतकऱ्यांना निदान यावर्षी तरी सुगीची अपेक्षा होती. गतवर्षीच्या हंगामात शेवटच्या टप्प्यात लॉकडाऊनमुळे थोडे फार नुकसान झाले तरीही कोरोनाच्या प्रादुर्भावापासून वाचण्यासाठी, रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी ‘व्हिटॅमिन सी’युक्त संत्राफळे प्रकाशझोतात आली. बाजारात वाढलेल्या मागणीमुळे उत्पन्नात भर पडेल, असा शेतकºयांना अंदाज होता. मात्र, ऐनवेळी बहराने हुलकावणी दिल्याने चिंतेचे सावट पसरले आहे.बहराच्या काळात दरवर्षी साधारणपणे दीड ते दोन हजार रुपये प्रतिहजार दराने व्यापारी सौदे करतात. यंदा मृग बहराचे उत्पादन अत्यल्प झाल्याने यावर्षी अभूतपूर्व बाजारभाव मिळत आहे. प्रतिहजार ४५०० रुपये दराने व्यापाºयांनी संत्री खरेदी केली. बळीराजा सांगेल तो दर द्यायला व्यापारी तयार असला तरी बागेत फळेच नाहीत. यामुळे ‘देव आला द्यायला, पण पदर नाही घ्यायला’ अशी शेतकºयांची परिस्थिती झाली आहे.चार वर्षांत नापिकीमुळे कफल्लक झालेल्या संत्राउत्पादक शेतकºयांना यावर्षीच्या नियोजन खर्चाची चिंता सतावत आहे.निसर्गाच्या चक्रव्यूहात अडकलेल्या संत्राउत्पादक शेतकºयांच्या मृग बहरात न आलेल्या संत्राबागांचे सर्वेक्षण करून शासनाने आर्थिक मदत करणे गरजेचे आहे.- रमेश जिचकार, संचालक, महाराष्ट्र राज्य संत्राउत्पादक संघयावर्षी चांगल्या भाव आहेत. मुबलक संत्री असती, तर चार वर्षात झालेले नुकसान भरून निघाले असते. आता चालू वर्षाचे व्यवस्थापन अशक्य आहे.- देवेंद्र ढोरेसंत्राउत्पादक, बेनोडा शहीद

टॅग्स :agricultureशेती