शहरं
Join us  
Trending Stories
1
एपस्टीन सेक्स स्कँडल: जगभरातील नेत्यांची झोप उडाली! दोन दिवस उरले, भारतीय नेत्यांचेही नाव?
2
तुळजापुरात भाजप-मविआच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा; काग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीर जखमी
3
दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देण्याचे सरकारचे आदेश; कुणाला मिळणार १० हजार?
4
बारामतीतील मुलीवर अंबाजोगाईमध्ये सामूहिक बलात्कार, बदामबाईने आधी कला केंद्रावर नेलं, नंतर लॉजवर...
5
संतापजनक...! IAS अधिकाऱ्याची गाडी तपासली; गोव्याच्या एसपींनी पोलिसांनाच दिली उठाबशांची शिक्षा...
6
निवृत्तीनंतर हातात येणार रग्गड पैसा! NPS चे नवीन नियम लागू; ५ वर्षांचा 'लॉक-इन' कालावधी संपला
7
माणिकराव कोकाटे यांचे मंत्रिपद जाणार? आज अजित पवार यांची भेट घेणार, मोठ्या निर्णयाची शक्यता
8
शिंदेसेना ही अमित शाहांची 'टेस्ट ट्यूब बेबी', त्यांचा नैसर्गिक जन्म नाही; राऊतांची बोचरी टीका
9
Video - बापमाणूस! ६० फूट खोल बोरवेलमध्ये पडलेल्या लेकीसाठी वडिलांनी लावली जिवाची बाजी
10
विमा क्षेत्रात आता १००% परकीय गुंतवणुकीला मंजुरी; सर्वसामान्यांना स्वस्त पॉलिसी आणि चांगले पर्याय मिळणार?
11
'इस्लामिक दहशतवादाविरोधात उभे राहण्याची गरज', व्हाइट हाऊसमधून ट्रम्प यांचं आवाहन; केली मोठी घोषणा
12
महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी; मुंबईत भाजपानं शिंदेसेनेला केवळ ५२ जागांचा दिला प्रस्ताव?
13
१९ तारखेला अत्यंत स्फोटक माहिती उघड होणार, ज्यानं भाजपा नेत्यांची फजिती होईल; संजय राऊतांचा दावा
14
टीम इंडियाला मल्टीप्लेक्समध्ये पाहून सगळचे चकीत झाले...; मैदानातील सगळेच धुरंधर 'धुरंधर' पहायला गेलेले...
15
Crime: बुरखा न घातल्यानं पती संतापला, पत्नीसह पोटच्या २ मुलींना संपवलं; मृतदेह पुरले खड्ड्यात!
16
कोण आहे डोनाल्ड ट्रम्प यांची होणारी सून...! मंगळवारीच उरकला साखरपुडा, दोघे भारतातही येऊन गेलेले...
17
उद्धव-राज विरुद्ध भाजप-शिंदेसेना असाच सामना; १३८ मराठी बहुल मतदारसंघ या निवडणुकीत ठरणार निर्णायक
18
सरकार आणखी एका बँकेतील हिस्सा विकण्याच्या तयारीत; खात्यात येणार २१०० कोटी, सध्या आहे ९५% हिस्सा
19
'उद्याच्या तेजस्वी पहाटेसाठी!' रितेश देशमुखचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील पहिला लूक समोर
20
प्रसिद्ध दिग्दर्शक आणि पत्नीच्या हत्या प्रकरणाला नवं वळण, पोलिसांनी लेकालाच केली अटक
Daily Top 2Weekly Top 5

तर दीपालीचे प्राण वाचले असते !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:14 IST

कॉमन परतवाडा (अमरावती) : हरिसाल वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणात गुगामल वन्यजीव विभागाचा उपवनसंरक्षक विनोद ...

कॉमन

परतवाडा (अमरावती) : हरिसाल वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणात गुगामल वन्यजीव विभागाचा उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याच्याविरुद्ध गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली. मात्र, त्याची पाठराखण करणाऱ्या तत्कालीन एपीसीसीएफ श्रीनिवास रेड्डी विरुद्ध गुन्हा दाखल केव्हा होणार यावर आता चर्चा सुरु असताना अचलपूर न्यायालयाने अंतरिम अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळताना विनोद शिवकुमार वर वेळीच कारवाई केली असती, तर दीपाली चव्हाणचे प्राण वाचले असते गंभीर मत नोंदविले आहे.

राज्यभर ५ एप्रिलपासून रेंजसर् असोसिएशनने काम बंदचा दिलेला इशारा काळ्या फिती लावून निषेधवरच संपविला का, असे विविध प्रश्न आता संतप्त कर्मचाऱ्यांमध्ये धुमसू लागले आहेत.

दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार जेवढा दोषी आहे, तितकेच एम. एस. रेड्डी हेेे देखील जबाबदार असल्यामुळे त्यांना सह आरोपी करण्याची मागणी महाराष्ट्रर स्टेट गॅझेटेड फॉरेस्ट ऑफिसर्स असोशियनच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना २६ मार्च रोजी एका पत्राद्वारे करण्यात आली होती. अन्यथा असहकार आंदोलनाचा इशारा अध्यक्ष सुभाष डोंगरे, महासचिव योगेश वाघाये यांनी दिला होता . तर फॉरेस्टट रेंजर असोशियन महाराष्ट्र या दुसर्‍या एका संघटनेतर्फे संपूूर्ण प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी आणि विनयभंग सह खुनाचा गुन्हा दाखल करावा. सोबतच श्रीनिवास रेड्डी सह सहभागी सर्वांवर फौजदारी कारवाई करण्याची कारवाई लेखी पत्राद्वााारे करण्यात आली होती. घटनेला २० दिवस उलटूनही श्रीनिवाास रेड्डीविरुद्ध गुन्हा दाखल झाला नसताना संघटना गप्प का, मार्च महिनाा असताना शासकीय यंत्रणा व्यस्त झाल्या का, असे प्रश्न आता निर्माण झाले आहेत.

बॉक्स

रेड्डी ची कृती कलम १०७ नुसारच

अचलपुर न्यायालयाने श्रीनिवास रेड्डी यांना अंतरिम अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळताना दिलेल्या अहवालात क्रमांक २० च्या मुद्द्यानुसार विभागाचे प्रशासकीय प्रमुख असल्याने विनोद शिवकुमार यांच्याविरूद्ध मृत दिपाली चव्हाण यांना होणार्‍या छळाच्या सर्व घटनांची माहिती असताना विशेषत: अर्जदाराने अथार्त श्रीनिवास रेड्डी यांनी दखल घेणे हे कर्तव्य होते. अर्जदाराची ही कृती भारतीय दंड संहितेच्या कलम १०७ नुसार त्याच्या बाजूने "बेकायदेशीर वगळणे" अशी आहे. विनोद शिवकुमार यांच्यावर अर्जदाराने कारवाई केली असती तर दीपाली चव्हाण यांचे प्राण वाचू शकले असते. असे गंभीर मत अचलपुर न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश क्रमांक १ एस. के. मुंगीलवार यांनी रेड्डीचा अंतरिम अटकपूर्व जामीन नाकारताना नोंदविले. तर अर्जदाराने (रेड्डीने) जाणूनबुजून आरोपी विनोद शिवकुमारविरूद्ध कोणतीही कारवाई न करता त्यांना मदत केली असल्याचे मत देखील व्यक्त केले. पोलिसांनी रेड्डी विरुद्ध गुन्हा नोंदविणे आवश्यक असतांना घटनेच्या २० दिवसांनंतरही पोलिसांचा आणि तपासणी समितीचा तपास सुरू आहे.

बॉक्स

काय आहे कलम १०७

भारतीय दंड संहितेच्या कलम १०७ नुसार श्रीनिवास रेड्डी यांची कृती असल्याचे मत अचलपुर न्यायालयाने नोंदविताना सदर कलम आत्महत्या परावृत्त करणे किंवा परावृत्त करण्यास मदत करणे असा त्याचा अर्थ असून त्यामुळे श्रीनिवास रेड्डी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ तर होत नाही ना अशी शंका आता वर्तविली जात आहे.